Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
चिराग दारूवाला
चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : आज स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा एखाद्या विशिष्ट कामाशी संबंधित योजना सुरू होऊ शकते. इतरांकडून मदतीची अपेक्षा करू नका आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. भविष्याचा विचार करण्यापेक्षा वर्तमानातील कार्यांकडे लक्ष द्या. घर आणि व्यवसाय यांच्यात योग्य ताळमेळ ठेवा, अशी सूचना श्रीगणेश करतात. भावा-बहिणींसोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे.
वृषभ : ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल आहे. आर्थिक योजना प्रत्यक्षात येऊ शकते. बहुतांश कामे मार्गी लागतील. सामाजिक उपक्रमांसाठी तुमचे निस्वार्थ योगदान तुम्हाला मनःशांती देईल, असे श्रीगणेश सांगतात. वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका. संभाषण करताना नकारात्मक बोलणे टाळा अन्यथा पश्चातापाचे कारण बनू शकते. व्यवसायात व्यस्त राहू शकता. कौटुंबिक बाबींमध्ये जास्त हस्तक्षेप करू नका.
मिथुन : श्रीगणेश म्हणतात की, आज सामाजिक उपक्रमात सहभागी व्हाल. अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त असाल. कोणतेही विशेष कार्य पूर्ण करण्यात तुमची मेहनत यशस्वी होईल. घरातील सुखसोयींशी संबंधित खरेदीसाठी वेळ मिळेल. काही सामान्य बाबींवरून शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतो. रागासह बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मुलाच्या संगतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. व्यवसायाशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वेळ अनुकूल नाही. कौटुंबिक जीवन सुखकर होऊ शकते.
कर्क : श्रीगणेश म्हणतात की, मागील चुकांमधून शिकून कामाची प्रक्रिया सुधारण्यास सक्षम व्हाल. भविष्यातील उद्दिष्टे साध्य होण्याची शक्यता आहे. चांगली बातमी तुम्हाला आत्मविश्वास आणि नवीन ऊर्जा देईल. वस्तू किंवा वाहन बिघाडामुळे मोठा खर्च होऊ शकतो. चुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित एखाद्या हितचिंतकाशी चर्चा होऊ शकते. व्यावसायिक तणावाचे घर-कुटुंबावर परिणाम होऊ देऊ नका.
सिंह : आज ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. या वेळेचा हुशारीने वापर करा. तुमची योग्यता आणि प्रतिभा यांच्या जोरावर तुम्ही काम व्यवस्थित पूर्ण करू शकाल. मालमत्तेशी संबंधित कोणतेही प्रकरण निकाली निघण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंकण ठेवा अन्यथा तुमचे आर्थिक गणित बिघडू शकते. कोणत्याही प्रकारचा वाद टाळा. कौटुंबिक कार्यात तुमच्या सहकार्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील.
कन्या : श्रीगणेश म्हणतात की, आज व्यस्त दिनचर्येतून थोडा वेळ विश्रांती आणि मौजमजेसाठी काढू शकाल. नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याशी चर्चेतून समस्या सोडवता येतील. तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी काही विशेष नियम कराल. तुमच्या वैयक्तिक कामांमध्ये इतरांना हस्तक्षेप करू देऊ नका. यशाबाबत चर्चा करु नका. व्यवसायात नवीन योजना बनवण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहू शकते.
तूळ : आज वेळ सकारात्मकरित्या जाईल. घरातील वडिलधाऱ्यांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनानुसार वागल्यास निश्चित यश मिळू शकेल. सामाजिक सेवा संस्थेसाठी विशेष योगदान राहील. जवळचे नातेवाईक किंवा मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. तुमच्या कार्यक्षेत्रात काही बदल करायचे असतील तर वास्तू नियमांचे पालन करा. कोणत्याही समस्येमध्ये जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेणे योग्य राहील, असा सल्ला श्रीगणेश देतात.
वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, तुम्ही तुमच्या कामात चांगली सुधारणा कराल. कोणत्याही विशेष कामासाठी तुमची मेहनत यशस्वी होईल. एखाद्या खास व्यक्तीसोबत भेटही होऊ शकते. आध्यात्मिक कार्यात थोडा वेळ घालवा. विनाकारण एखाद्याशी वाद होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. चुकीच्या कामात वेळ वाया घालवू नका. त्याचा तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होईल. जमीन-मालमत्तेबाबत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार चांगले परिणाम मिळू शकतात.
धनु : आज कोणतेही काम घाई न करता संयमाने करा, अशी सूचना श्रीगणेश करतात. मुलांच्या समस्यांवर उपाय शोधण्यातही तुमचे विशेष योगदान असेल. तुम्हाला तुमच्या आवडीच्या कामांसाठी वेळ मिळेल. शेजाऱ्यांशी कोणत्याही वादात पडू नका. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. जवळच्या नातेवाइकाच्या संदर्भात कोणतीही दुःखद बातमी मिळाल्याने मन निराश होईल. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.
मकर : आज तुमच्या दैनंदिन दिनचर्येपेक्षा काही वेगळे शिकण्याचा प्रयत्न करा. सामाजिक उपक्रमात तुमच्या सल्ल्याला प्राधान्य मिळेल. यावेळी कोणत्याही प्रकारची जोखीम घेणे टाळा. त्याचा तुमच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मार्केटिंगशी संबंधित अधिक ज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे.
कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, व्यस्त दिनचर्येव्यतिरिक्त काही वेळ ऑनलाइन शॉपिंग आणि कुटुंबासह मजा कराल. घरातील कोणत्याही मागणीच्या कामाशी संबंधित योजना असेल. उतावळेपणाने आणि भावनेने कोणताही निर्णय घेऊ नका. चूक होण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारच्या संभाषणात योग्य शब्द वापरा. कौटुंबिक व्यवसायात तुमच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडतील. पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात.
मीन : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि आवडीच्या कामात जास्त वेळ घालवाल. यामुळे मानसिकदृष्ट्या सुखावाल. तुमच्या हट्टीपणामुळे नातेवाईकांशी संबंध खराब होऊ शकतात. मुलांना मैत्रीपूर्ण वागणूक देणे योग्य ठरेल. व्यवसायात भागीदारीबाबत कोणताही निर्णय घेण्यासाठी वेळ योग्य नाही. घरातील वातावरण सामान्य राहील.