आध्यात्मिक गुरू ओशो यांची भूमिका करायला आवडेल : नवाजुद्दीन सिद्दीकी

पणजी : गोवा हे जगभरातील सिने कलाकारांसाठी आवडते ठिकाण आहे. तसेच ते माझेही आहे. गोव्याचे सौंदर्य, येथील संस्कृती आणि गोमंतकीयांचे आदरातिथ्य हे त्याचे मुख्य कारण आहे. गोव्यात चित्रीकरणासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. सध्या माझ्या एका चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात सुरू आहे. मला संधी मिळाली तर आध्यात्मिक गुरू ओशो यांची भूमिका करायला आवडेल, अशी भावना बॉलिवूड अभिनेते … The post आध्यात्मिक गुरू ओशो यांची भूमिका करायला आवडेल : नवाजुद्दीन सिद्दीकी appeared first on पुढारी.
#image_title

आध्यात्मिक गुरू ओशो यांची भूमिका करायला आवडेल : नवाजुद्दीन सिद्दीकी

दीपक जाधव

पणजी : गोवा हे जगभरातील सिने कलाकारांसाठी आवडते ठिकाण आहे. तसेच ते माझेही आहे. गोव्याचे सौंदर्य, येथील संस्कृती आणि गोमंतकीयांचे आदरातिथ्य हे त्याचे मुख्य कारण आहे. गोव्यात चित्रीकरणासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. सध्या माझ्या एका चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात सुरू आहे. मला संधी मिळाली तर आध्यात्मिक गुरू ओशो यांची भूमिका करायला आवडेल, अशी भावना बॉलिवूड अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी व्यक्त केली.
आनंद सुरापूर दिग्दर्शित ‘रौतू की बेली’ या हिंदी चित्रपटाचा ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रीमियर पार पडला. त्यानंतर पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सिद्दीकी बोलत होते.
ते म्हणाले, देशभरातील स्थानिक पार्श्वभूमी असलेल्या अस्सल कथा दाखवणार्‍या चित्रपटांना जागतिक स्तरावर ओळख मिळेल. उत्तर भारतातील पर्वतीय भागातील रौतू की बेली या सुंदर शहरावर आधारित हा चित्रपट आहे. या शहरातील एका शाळेचा वॉर्डन मृत आढळल्यानंतर पोलिस निरीक्षक नेगी आपल्या सोबत प्रेक्षकांना देखील तपास मोहिमेवर घेऊन जातो. मला केवळ एका विशिष्ट प्रकारच्या व्यक्तिरेखांपुरतेच मर्यादित रहायचे नाही. मला स्टार या टॅग लाईनमध्येही अडकायचे नाही. मी सर्वसामान्य कलाकार म्हणून आयुष्य जगतो. कोणतीही व्यक्तिरेखा साकारताना त्या व्यक्तिरेखेचे जीवन जगण्याचा माझा प्रयत्न असतो, असेही ते म्हणाले.
दिग्दर्शक आनंद सुरापूर म्हणाले, कथा सांगण्याची आवड आणि अनोख्या कल्पना हेच माझ्या प्रेरणेचे मुख्य स्त्रोत आहेत. या सार्‍या गोष्टी या चित्रपटामध्ये रसिकांना भावतील. पटकथा लेखक शरिक पटेल म्हणाले, हा चित्रपट त्याच्या व्यक्तिरेखांच्या बाबतीत पठडीबाहेरचा असून एका हत्याकांडावरील रहस्यपट आहे.
हेही वाचा : 

IFFI Goa 2023 : नाते संबंधांवर चित्रपट बनवायला आवडतो : नुरी बिलग सेयलान
iffi awards 2023 : तीन पिढ्यांच्या घर- कुटुंबावर भाष्य करणारा ‘गुलमोहोर’ सादर
IFFI 2023 : महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवणारा ‘फाईट लाइक अ गर्ल’

 
The post आध्यात्मिक गुरू ओशो यांची भूमिका करायला आवडेल : नवाजुद्दीन सिद्दीकी appeared first on पुढारी.

पणजी : गोवा हे जगभरातील सिने कलाकारांसाठी आवडते ठिकाण आहे. तसेच ते माझेही आहे. गोव्याचे सौंदर्य, येथील संस्कृती आणि गोमंतकीयांचे आदरातिथ्य हे त्याचे मुख्य कारण आहे. गोव्यात चित्रीकरणासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. सध्या माझ्या एका चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात सुरू आहे. मला संधी मिळाली तर आध्यात्मिक गुरू ओशो यांची भूमिका करायला आवडेल, अशी भावना बॉलिवूड अभिनेते …

The post आध्यात्मिक गुरू ओशो यांची भूमिका करायला आवडेल : नवाजुद्दीन सिद्दीकी appeared first on पुढारी.

Go to Source