राहूल गांधी यांचा खराब हवामानामुळे लातूरमध्ये मुक्काम

लातूर, पुढारी वृतसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहूल गांधी हे आज (दि. २४) लातूर मुक्कामी असून खराब हवामानामुळे विमान उड्डाण शक्य नसल्यामुळे पायलटच्या सल्ल्यानुसार त्यांनी लातूर येथे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. खासदार राहूल गांधी हे सोलापूरला जाण्यासाठी अमरावती येथून विमानाने आज (दि.२४) दुपारी लातूर विमानतळावर आले होते. तेथून ते हॅलीकॉप्टरने सोलापूर येथील सभेला …

राहूल गांधी यांचा खराब हवामानामुळे लातूरमध्ये मुक्काम

लातूर, Bharat Live News Media वृतसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहूल गांधी हे आज (दि. २४) लातूर मुक्कामी असून खराब हवामानामुळे विमान उड्डाण शक्य नसल्यामुळे पायलटच्या सल्ल्यानुसार त्यांनी लातूर येथे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.
खासदार राहूल गांधी हे सोलापूरला जाण्यासाठी अमरावती येथून विमानाने आज (दि.२४) दुपारी लातूर विमानतळावर आले होते. तेथून ते हॅलीकॉप्टरने सोलापूर येथील सभेला रवाना झाले. सोलापूर येथील सभा आटपून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते परत लातूर विमानतळावर आले. तथापि उड्डाण करण्यास वातावरण अनुकूल नसल्याने त्यांनी लातूर येथे मुक्काम करण्याचे ठरवले. त्यांचा मुक्काम लातूर येथील ग्रँड हॉटेलमध्ये असून तेथे त्यांनी या दरम्यान आज आमदार अमित देशमुख यांच्याशी महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती, निवडणूक प्रचार यंत्रणा, काँग्रेस व महाविकास आघाडी या विषयांवर चर्चा केली. दरम्यान ते गुरुवारी (दि.२५) सकाळी लातूरहून निघणार आहेत. ते काँग्रेस उमेदवाराच्या प्राचारार्थ गुरुवारी ‘रोड शो’ करण्याची चर्चा शहरात होती, तथापि त्यास दुजोरा मिळाला नाही. रात्रीच्या उड्डानाची सोय लातूर विमानतळावर नसल्याने राहुल गांधी लातूरमध्ये थांबले आहेत. ते आल्याचे समजताच लातूर येथील ग्रँड हॉटेल समोर काँग्रेस पदाधिकारी तसेच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा :

रावसाहेब दानवेंचा शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल; भव्य रॅलीसह सभा
Lok Sabha Elections 2024 : दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या, २६ एप्रिलला देशात ८९ तर राज्यात ८ मतदारसंघात मतदान
विधान परिषदेची कोकण पदवीधर निवडणूक काँग्रेस लढवणार: नाना पटोले