नितीन गडकरी यांना सभेत बोलताना भोवळ, कार्यकर्त्यांनी सावरले

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : भाजपचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना कडक उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने प्रचार सभेतच बोलताना भोवळ आल्याची घटना आज (दि.२४) दुपारी घडली. पदाधिकारी, कार्यकर्ते व सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्यांना सावरले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. 26 एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी पश्चिम विदर्भातील प्रचारतोफा …

नितीन गडकरी यांना सभेत बोलताना भोवळ, कार्यकर्त्यांनी सावरले

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : भाजपचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना कडक उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने प्रचार सभेतच बोलताना भोवळ आल्याची घटना आज (दि.२४) दुपारी घडली. पदाधिकारी, कार्यकर्ते व सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्यांना सावरले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
26 एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी पश्चिम विदर्भातील प्रचारतोफा आज शांत होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज यवतमाळ जिल्ह्यातील निवडणूक प्रचारादरम्यान पुसद येथे ही घटना घडली. शिवसेना महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी जाहीर सभेत मार्गदर्शन करीत होते. एकदम गर्दी करू नका,हवा येऊ द्या असे गडकरी तत्पूर्वी म्हणाले, त्याचवेळी बोलताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि व्यासपीठावरील नेते,पदाधिकारी व सुरक्षा रक्षकांनी सावरत स्टेजच्या मागील बाजूला नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून ते बोलत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. नागपुरातील लोकसभा निवडणुकीची धामधूम आटोपताच गडकरी यांचे सतत पश्चिम विदर्भ व राज्यातील इतर प्रचार सभांसाठी हेलिकॉप्टर विशेष विमानाने दौरे सुरू आहेत हे विशेष.
यानंतर काहो वेळातच त्यांनी पुन्हा उपस्थिताना मार्गदर्शन केले. हेलिकॉप्टरचा एसी बंद झाल्याने आणि कडक उन्हामुळे आपल्याला काही वेळ त्रास झाला, आराम करावा लागला, याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.
हेही वाचा 

नागपूर: लग्नाला जाताना भीषण अपघात, दाम्पत्याचा मृत्यू, ६ जण जखमी
नागपूर: पीएम मोदींनी जाणून घेतली पदाधिकाऱ्यांकडून ‘मन की बात’
Lok Sabha Election 2024 – नागपूर ५४.११, रामटेक ६१ टक्के मतदान; कमी टक्का कुणाला धक्का!