मतदानाच्या दिवशी साक्री, शिरपूर आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश
धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित झाला असून 16 मार्च, 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. नंदुरबार लोकसभा मतदार संघातंर्गत धुळ्याचे साक्री विधानसभा मतदार संघ व शिरपूर विधानसभा मतदार संघात सोमवार, 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी निर्गमित केले आहे.
02-साक्री विधानसभा मतदारसंघात सोमवार 13 मे 2024 रोजी म्हसदी प्र.नेर, जैताणे, वार्सा येथे भरणारा आठवडे बाजार, 12 ते 14 मे, 2024 रोजी धाडणे येथे होणारा आई भवानी मातेचा यात्रोत्सव तसेच 09-शिरपूर विधानसभा मतदारसंघातील तोंदे, म.दोंदवाडे, शिरपूर ब्रु, शिरपूर खु, वरवाडे गावात भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्यात येवून ते दुसऱ्या दिवशी भरविण्यात यावे, असेही गोयल यांनी आदेशात नमूद केले आहे.
हेही वाचा-
Delhi Liquor Policy : मनीष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मेपर्यंत वाढ
पिंपळनेर : बी.एड् शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वार्षिक परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळा