मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मेपर्यंत वाढ
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्ली मद्य धोरण संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आप नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आज ( दि. २४) मोठा धक्का बसला. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी न्यायालयाने सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत २६ एप्रिलपर्यंत वाढ केली होती.
यासोबतच या प्रकरणातील जबाब आणि पुरावे दाखवण्यासाठी एक टेबल तयार करण्याचे निर्देशही न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ मे रोजी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात होणार आहे.