विमानातून उडी टाकून रिक्षाने शरद पवारांचे घर गाठले: उत्तम जानकर

मोडनिंब : पुढारी वृत्तसेवा: यापूर्वी केलेली चूक माझ्या लक्षात आली आहे. आम्ही १ लाख १६ हजार मतांनी विद्यमान खासदार यांना निवडून दिले. ही चूक आता होणार नाही. आता रेकॉर्ड ब्रेक आकडा करून राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार धैर्यशील मोहिते- पाटील निवडून आणू. त्यांना सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे, अशी ग्वाही धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर …

विमानातून उडी टाकून रिक्षाने शरद पवारांचे घर गाठले: उत्तम जानकर

मोडनिंब : Bharat Live News Media वृत्तसेवा: यापूर्वी केलेली चूक माझ्या लक्षात आली आहे. आम्ही १ लाख १६ हजार मतांनी विद्यमान खासदार यांना निवडून दिले. ही चूक आता होणार नाही. आता रेकॉर्ड ब्रेक आकडा करून राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार धैर्यशील मोहिते- पाटील निवडून आणू. त्यांना सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे, अशी ग्वाही धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी दिली.
माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते – पाटील यांच्या प्रचारार्थ मोडनिंब येथील मार्केट यार्डमध्ये शरद पवार यांची प्रचार सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.
उत्तम जानकर पुढे म्हणाले की, यानंतर सुद्धा तुमच्या मनातीलच आमदार आपण करू, काळजी करू नका. यापूर्वी केलेली चूक माझ्या लक्षात आली आहे. मी सर्वसामान्यांचे ऐकले, निष्कर्ष काढला आणि चालू विमानातून उडी मारून रिक्षाने शरद पवार यांच्या घरी गेलो, असे म्हणताच उपस्थितांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.
दरम्यान, उत्तम जानकर राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते असून  त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते-पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांना पक्षातून काढून टाकत असतील, तर मला अजित पवार यांना काढायला अडचण काय? असा सवाल करून  मला काही अजून पक्षातून काढून टाकलेले नाही. मीही रोज विचारतोय की मला पक्षातून काढलाय का?  मीही संस्थापक सदस्य असल्याने मीच अजित पवार यांना पक्षातून काढू शकतो, असे विधान जानकर यांनी केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी त्यांच्यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
हेही वाचा 

पंतप्रधान मोदींनी दिलेले शब्द पाळले नाहीत : शरद पवार
Loksabha election : माढा लोकसभा मतदारसंघात काका-पुतणे आमने-सामने?
Sharad Pawar | माढातून लोकसभा निवडणूक लढणार का?; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं