Crime News : बेकायदा पिस्तुले बाळगणार्‍याला बेड्या; येरवडा पोलिसांची कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बेकायदा पिस्तूल बाळगणार्‍या सराइताला येरवडा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले आणि चार राउंड जप्त केले आहेत. अभिषेक नारायण खोंड (वय 23, रा. लोहगाव रोड, वाघोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. खोंड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी येरवडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून, मोक्काच्या गुन्ह्यात येरवडा …

Crime News : बेकायदा पिस्तुले बाळगणार्‍याला बेड्या; येरवडा पोलिसांची कारवाई

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : बेकायदा पिस्तूल बाळगणार्‍या सराइताला येरवडा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले आणि चार राउंड जप्त केले आहेत. अभिषेक नारायण खोंड (वय 23, रा. लोहगाव रोड, वाघोली) असे अटक केलेल्याचे
नाव आहे. खोंड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी येरवडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून, मोक्काच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात होता. सहा महिन्यांपूर्वी तो कारागृहातून बाहेर आला आहे. दरम्यान, मागील आठव्यात शहरात सलग चार गोळीबारांच्या घटना घडल्या आहेत. येरवडा परिसरातील एका गोळीबाराच्या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात मिळणारी बेकायदा पिस्तुले आणि त्यातून होणारा गोळीबाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खोंड याच्या विरुद्ध बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी आर्म अ‍ॅक्टनुसार येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तपास पथकाचे पोलिस अंमलदार कैलास डुकरे आणि सुशांत भोसले, सराईत गुन्हेगार तपासत होते. त्या वेळी दोघांना खोंड याच्याकडे पिस्तूल असून, तो वडगाव शेरी भागातील नदीपात्रात कोणाचीतरी वाट पाहत थांबल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील यांच्या पथकाने खोंड याला पकडले. त्याची चौकशी करून अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे 65 हजार रुपये किमतीची पिस्तुले आणि चार काडतुसे मिळून आली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, गुन्हे निरीक्षक राहुल जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, प्रदीप सुर्वे, कर्मचारी दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, नटराज सुतार, सूरज ओंबासे यांच्या पथकाने केली.
हेही वाचा

नूडल्सच्या पाकिटातून हिर्‍यांची, तर अंतर्वस्त्रातून सोन्याची तस्करी
चैत्री पौर्णिमेनिमित्त जेजुरीत भाविकांची गर्दी : खंडोबा देवाला दवण्याची पूजा
सलमान गोळीबार प्रकरणातील दोन्ही पिस्तुले, चार मॅगझिन, सतरा जिवंत काडतुसे जप्त