बापाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी रचला होता ‘गेम सेट’; पोलिसांनी हाणून पाडला प्रयत्न

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आपल्या बापला निर्घृणपणे मारणार्‍या चॉकलेट सुन्याचा गेम करण्यासाठीच नीलेश वाडकरचा मुलगा नवनाथ वाडकरने त्याचा गेम सेट करण्याचा प्लॅन आखला होता. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याचा हा प्लॅन हाणून पाडला होता. याप्रकरणी त्याच्यासह त्यांच्या साथीदारांवर दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून पुणे पोलिस हे नवनाथ वाडकरच्या मागावर होते. अखेर पोलिसांच्या …

बापाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी रचला होता ‘गेम सेट’; पोलिसांनी हाणून पाडला प्रयत्न

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : आपल्या बापला निर्घृणपणे मारणार्‍या चॉकलेट सुन्याचा गेम करण्यासाठीच नीलेश वाडकरचा मुलगा नवनाथ वाडकरने त्याचा गेम सेट करण्याचा प्लॅन आखला होता. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याचा हा प्लॅन हाणून पाडला होता. याप्रकरणी त्याच्यासह त्यांच्या साथीदारांवर दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून पुणे पोलिस हे नवनाथ वाडकरच्या मागावर होते. अखेर पोलिसांच्या रडारवर नवनाथ आल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
जानेवारी 2019 मध्ये सराईत गुंड नीलेश वाडकर याचा तडीपारीत असताना देखील गुंड चॉकलेट सुन्या ऊर्फ सुनील डोकेफोडे याच्या टोळीने वर्चस्व वादातून खून केला होता. या प्रकरणात पुढे 19 जणांवर मोक्काची कारवाई करण्यात आली होती.
नीलेश वाडकर व चॉकलेट सुन्या सराईत गुन्हेगार होते. जनता वसाहतीमधील वर्चस्वातून दोन टोळीत मतभेद होते. जनता वसाहतमधील जयभवानीनगर व पर्वती टेकडी हा परिसर, विठ्ठल मंदिर या परिसरावरून चॉकलेट सुन्या आणि नीलेश वाडकर यांच्यात वर्चस्ववाद होता. वाडकर हा पोलिसावर गोळीबाराच्या गुन्ह्यात कारागृहात होता. जामिनावर सुटल्यानंतर वाडकर हा चॉकलेट सुन्याच्या मागावर होता. या टोळीच्या वर्चस्वातून रात्री चॉकलेट सुन्या व त्याच्या साथीदारांनी जनता वसाहतीत गल्ली क्रमांक तीनमध्ये वाडकर आणि त्याच्या साथीदारांना जानेवारी 2019 मध्ये गाठले. त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करून वाडकरचा निर्घृणपणे खून केला होता.
मात्र, आपल्या बापाच्या खुनाच्या बदल्याची आग नीलेश वाडकरचा मुलगा नवनाथ वाडकर याच्या मनात धगधगत होती. याच बदल्याच्या भूमिकेतून त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने पंधरा दिवसांपूर्वी चॉकलेट सुन्याचा गेम सेट केला होता. परंतु, पोलिसांना वेळीच खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी नवनाथ वाडकर आणि त्याच्या गँगचा प्रयत्न हाणून पाडला. नवनाथ वाडकर याच्या मागावर पोलिस असताना त्यांना नवनाथ याचेबाबत खबर मिळाली होती. मात्र, त्याला पकडताना गोळीबाराचा थरार घडला. अखेर पोलिसांनी जिगरबाजपणे त्याच्याकडून झालेल्या गोळीबाराला प्रतिउत्तर देत नवनाथच्या मुसक्या आवळल्या.
हेही वाचा

Nashik News | वडनेर भैरवला रथ मिरवणुकीत भाविकाचा मृत्यू, दोन्ही पायांवरून चाक गेल्याने दुर्घटना
राहुल गांधींची सोलापूर, अमरावतीत आज प्रचारसभा
शिक्षक भरती रद्द प्रकरणी प. बंगाल सरकारची सुप्रीम कोर्टात धाव