Leopard News | काळवाडीत ‘तो’ बिबट्या अखेर जेरबंद!

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : काळवाडी (ता. जुन्नर) येथील बेल्हेकरवस्ती शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (दि 24) पहाटेच्या दरम्यान बिबट्या जेरबंद झाला. या बिबट्यास माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात हलवण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की काळवाडी परिसरातील बेल्हेकरवस्ती शिवारात वीस दिवसांपूर्वी शेतात काम असताना मंगल नवनाथ बेलेकर या महिलेवर बिबट्याने केळीच्या शेतातुन येत हल्ला …
Leopard News | काळवाडीत ‘तो’ बिबट्या अखेर जेरबंद!

आळेफाटा : Bharat Live News Media वृत्तसेवा : काळवाडी (ता. जुन्नर) येथील बेल्हेकरवस्ती शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (दि 24) पहाटेच्या दरम्यान बिबट्या जेरबंद झाला. या बिबट्यास माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात हलवण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की काळवाडी परिसरातील बेल्हेकरवस्ती शिवारात वीस दिवसांपूर्वी शेतात काम असताना मंगल नवनाथ बेलेकर या महिलेवर बिबट्याने केळीच्या शेतातुन येत हल्ला करत जखमी केले होते. यावेळी तेथे असणाऱ्या त्यांच्या पतीने आरडाओरडा केल्याने बिबट्याने तिथून धूम ठोकली होती. दरम्यान यानंतर वनविभागाने या घटनेची गंभीरतेने दखल घेत काळवाडीच्या या शिवारात दोन पिंजरे लावले होते.
काळवाडी येथील या शिवारातील भागाजी गबाजी हांडे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटेच्या दरम्यान एक बिबट्या जेरबंद झाला. घटनेची माहिती वनविभागास माहिती देण्यात आल्यानंतर आळे वनपरिक्षेत्रेचे वनपाल संतोष साळुंखे वनमजूर बि के खर्गे, रोशन नवले घटनास्थळी गेले. प्रभाकर बेल्हेकर व सरपंच तुषार वामन यांनीही या कामी सहकार्य केले. जेरबंद बिबट्यास माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात सकाळीच हलवण्यात आले आहे. जेरबंद झालेल्या बिबट नर जातीचा चार वर्षे वयाचा असल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली. या परिसरात आणखी बिबटे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यामुळे बिबट्याची दहशत येथे कायम असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा

राहुल गांधींची सोलापूर, अमरावतीत आज प्रचारसभा
मी पक्ष सोडणार नाही : अबू आझमी यांचे स्पष्टीकरण
पुणेकरांनो शहराचा पारा वाढला; हवामान खात्याचा चिंता वाढविणारा इशारा