मोठी बातमी! कर्नाटकातील सर्व मुस्लिमांना नोकरी आणि शिक्षणात ओबीसी आरक्षण

Bharat Live News Media ऑनलाईन : राज्य सरकारच्या आकडेवारीचा हवाला देत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने कर्नाटकातील मुस्लिमांच्या सर्व जाती आणि समुदायांचा राज्य सरकारच्या अंतर्गत नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणासाठी ओबीसींच्या यादीत समावेश केला आहे. श्रेणी II-B अंतर्गत, कर्नाटक राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसी मानले गेले आहे, असे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने (NCBC) स्पष्ट केले आहे.
आकडेवारीनुसार, कर्नाटकात १२.९२ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. “श्रेणी II-B अंतर्गत, कर्नाटक राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसी मानले गेले आहे,” असे एनसीबीसीने म्हटले आहे. श्रेणी-१ मध्ये १७ मुस्लिम समुदायांना तर श्रेणी-२ अ मध्ये १९ मुस्लिम समुदायांना ओबीसी मानले गेले आहे.
नदाफ, पिंजर, दरवेश, छप्परबंद, कसाब, फुलमाळी (मुस्लिम), नालबंद, कसाई, अथरी, शिकलीगरा, सिक्कलीगर, सालबंद, लदाफ, ठिकानगर, बाजीगरा, जोहरी आणि पिंजारी या १७ मुस्लिम समुदायांना श्रेणी १ मध्ये ओबीसी म्हणून मानले गेले आहे.
As per the data from Karnataka government, all castes and communities of Muslims of Karnataka have been included in the list of OBCs for reservation in employment and educational institutions under the state govt. Under Category II-B, all Muslims of Karnataka state have been… pic.twitter.com/eh1IYF3FX0
— ANI (@ANI) April 24, 2024
