पुणेकरांनो शहराचा पारा वाढला; हवामान खात्याचा चिंता वाढविणारा इशारा
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहराच्या कमाल तापमानात पुन्हा दोन ते तीन अंशांनी वाढ झाली आहे. मंगळवारी (दि.23) शिवाजीनगरचा पारा 38 वरून 40 तर कोरेगाव आणि लवळेचा पारा 41 अंशांवर गेला. त्यामुळे शहरात कमालीचा उकाडा जाणवत आहे. दरम्यान, तीन दिवस शहरात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. शहराच्या कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाल्याने मंगळवारी शहरात कमालीचा उकाडा जाणवत होता.
कोरेगाव पार्क, लवळे 41 तर बाकी सर्व भागांचे तापमान 40 अंशांवर गेले होते. दरम्यान, केरळ ते मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने शहरात पुन्हा बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागराकडून येत आहे. त्यामुळे शहरात 24 ते 26 पर्यंत मेघगर्जना अन् विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मंगळवारचे कमाल तापमान-
शिवाजीनगर 40, पाषाण 40, लोहगाव 40, चिंचवड 41, लवळे 41, मगरपट्टा 40, एनडीए 40, कोरेगाव पार्क 41.
हेही वाचा
Leopard attack : पिंपळवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तरूणी जखमी
22 दिवसांत 40 लाख परप्रांतीय मुंबईतून गावाकडे
Kareena Kapoor : इन्स्टा स्टार किली पॉलच्या गावात करीना कपूर, पाहा फोटो