बीड : किरकोळ कारणातून तरूणाची गळा चिरून हत्‍या

केज : पुढारी वृत्‍तसेवा केज शहरातील क्रांतीनगर भागात किरकोळ कारणावरून एका अठरा वर्षेीय तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, दिनांक २३ एप्रिल सायंकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास केज येथील वसंत विद्यालय जवळ असलेल्या क्रांतीनगर येथे गोरख महावीर हजारे व सनी शामराव लांडगे या दोघात किरकोळ कारणावरून भांडण …

बीड : किरकोळ कारणातून तरूणाची गळा चिरून हत्‍या

केज : Bharat Live News Media वृत्‍तसेवा केज शहरातील क्रांतीनगर भागात किरकोळ कारणावरून एका अठरा वर्षेीय तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, दिनांक २३ एप्रिल सायंकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास केज येथील वसंत विद्यालय जवळ असलेल्या क्रांतीनगर येथे गोरख महावीर हजारे व सनी शामराव लांडगे या दोघात किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यानंतर सनी लांडगे याने गोरख हजारे याला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर काही वेळाने सनी शामराव लांडगे याने त्याच्या शर्टमध्ये लपवून ठेवलेल्या धारदार शस्त्राने गोरख महावीर हजारे वय (१८ वर्षे) याच्या गळ्यावर वार केला. यात रक्तस्त्राव होवून जखमी असलेल्या गोरख हजारे याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी गोरख हजारे हा मृत झाल्याचे घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, पोलीस जमादार श्रीकांत चौधरी, रुक्‍मीन पाचपिंडे, बाळासाहेब अहंकारे संतोष गित्ते सचिन अहंकारे, शेख मतीन, प्रकाश मुंडे आणि चालक संभुदेव दराडे यांच्या मदतीने सनी लांडगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
मृताचे नातेवाईक राज संजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सनी शामराव लांडगे याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा : 

Aadhaar ATM : आधार एटीएम सर्व्हिस : घरबसल्या पैसे!

Lok Sabha Election 2024 : हायप्रोफाईल लढतींवर नजरा

माहिती अधिकार कार्यकर्त्याची अजब मागणी; आयुक्तांच्या बंगल्यातील आंब्यांचीही मागवली माहिती