सलग चौथ्या सत्रांत सेन्सेक्स, निफ्टी तेजीत, ‘हे’ शेअर्स आघाडीवर

पुढारी ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराने बुधवारी (दि.२४) सलग चौथ्या सत्रांत तेजीत सुरुवात केली. बाजारातील तेजीला रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक या हेवीवेट्स शेअर्सचा सपोर्ट मिळाला आहे. सेन्सेक्स २०० अंकांच्या वाढीसह ७३,९५० वर खुला झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक २२,४०० वर व्यवहार करत आहे. (Stock Market Updates) संबंधित बातम्या :  बदल आरोग्य …
सलग चौथ्या सत्रांत सेन्सेक्स, निफ्टी तेजीत, ‘हे’ शेअर्स आघाडीवर

Bharat Live News Media ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराने बुधवारी (दि.२४) सलग चौथ्या सत्रांत तेजीत सुरुवात केली. बाजारातील तेजीला रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक या हेवीवेट्स शेअर्सचा सपोर्ट मिळाला आहे. सेन्सेक्स २०० अंकांच्या वाढीसह ७३,९५० वर खुला झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक २२,४०० वर व्यवहार करत आहे. (Stock Market Updates)
संबंधित बातम्या : 

बदल आरोग्य विम्यातील
आधार एटीएम सर्व्हिस : घरबसल्या पैसे!
आता सतत KYC ची गरज नाही, ‘युनिफॉर्म केवायसी’ लागू होणार, जाणून घ्या याविषयी

सेन्सेक्सवर जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक हे शेअर्स तेजीत आहेत. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, टायटन, इंडसइंड बँक, इन्फोसिस या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून येत आहे.
निफ्टीवर सिप्ला, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, हिंदाल्को हे टॉप गेनर्स आहेत. तर टाटा कन्झ्यूमर, एचडीएफसी लाईफ, टायटन या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. एफएमसीजी वगळता, एनएसईवरील सर्व निर्देशांक वाढीसह व्यवहार करत आहेत.
क्षेत्रीय पातळीवर काय स्थिती?
क्षेत्रीय पातळीवर निफ्टी रियल्टी १ टक्क्यांनी वाढला आहे. निफ्टी मेटल, ऑटो, बँक, फार्मा, हेल्थकेअर, ऑईल आणि गॅस हेदेखील वाढीसह खुले झाले आहेत. निफ्टी मिडकॅप १०० आणि स्मॉलकॅप १०० हेही तेजीत आहेत. (Stock Market Updates)
जागतिक बाजार
MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा विस्तृत निर्देशांक १.५ टक्क्यांनी वाढला आहे. हा निर्देशांक मंगळवारी १ टक्के वाढला होता. दरम्यान, जपानचा निक्केई निर्देशांक २ टक्क्यांनी वाढला आहे. अमेरिकेच्या बाजारातील निर्देशांक मंगळवारी वधारुन बंद झाले होते.
हेही वाचा : 

पोस्टाची ग्रामसुरक्षा योजना; वृद्धापकाळात बनेल आधार
ईपीएफओचा नवा नियम : आता काढा दुप्पट रक्कम
यंग इंडियाची मानसिकता विराट कोहलीसारखी : रघुराम राजन असं का म्‍हणाले?