शिवम दुबेच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी १००० धावा पूर्ण
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज शिवम दुबे याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएलमध्ये संघासाठी एक हजार धावा पूर्ण केल्या. शिवम दुबे आणि रुतुराज गायकवाड यांनी एकत्रितपणे चौथ्या विकेटसाठी १०४ धावा जोडून सुपर किंग्जला ४ बाद २१० धावांपर्यंत मजल मारली.
लखनौचा चेन्नईवर सुपर विजय
ऋतुराज गायकवाडच्या शतकाला लखनौ सुपर जायंटस्च्या मार्कस स्टोईनिसने शतकानेच उत्तर दिले. चेन्नई सुपर किंग्जच्या २१० धावांचा पाठलाग करताना लखनौची आघाडीची फळी अपयशी ठरली; पण स्टोइंनिसने देवदत्त पडिक्कल व निकोलस पूरन यांच्यासह अर्धशतकी भागीदारी करून लखनौच्या विजयाच्या आशा कायम राखल्या. त्याने ‘आयपीएल’मधील त्याचे पहिले शतक पूर्ण केले. त्याच्या शतकाच्या जोरावर लखनौने रोमहर्षक विजयाची नोंद केली आणि ६ विकेटस्ने मॅच जिंकून १० गुणांसह गुण तालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली.
चेन्नईच्या होमग्राऊंडवर त्यांच्या दोनशेपार धावांचा पाठलाग करताना दीपक चहरच्या पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉक (०) त्रिफळाचीत झाला; पण कर्णधार के. एल. राहुल व मार्कस स्टोईनिस यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला; पण मुस्तफिजूर रहमानने पाचव्या षटकात के. एल. राहुलला (१६) माघारी पाठवून मोठा धक्का दिला. स्टोईनिसने २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि संघाला १० षटकांत २ बाद ८३ धावांपर्यंत पोहोचवले. ११ व्या षटकात ऋतुराजने मथिशा पथिराणाला गोलंदाजीला आणले आणि त्याने शेवटच्या चेंडूवर देवदत्त पडिक्कलचा (१३) १५१ कि.मी. वेगाने टाकलेल्या चेंडूवर त्रिफळा उडवला. या सामन्यात शिवम दुबेने सीएसकेसाठी ६६ धावा आणि आयपीएलमध्ये संघासाठी तब्बल एक हजार धावा पूर्ण केल्या.
हेही वाचा :
ऋतुराजपेक्षा भारी स्टोईनिसचे शतक; लखनौचा चेन्नईवर सुपर विजय
CSK vs LSG : चेन्नईचे लखनौला 211 धावांचे आव्हान
गुकेशच्या ‘बुद्धिबळ’वर कास्पारोवही अवाक; म्हणाले, “टोरंटोमध्ये भारतीय भूकंप”