पनवेल : ‘आरटीओ’ मध्ये अडीच हजारांची लाच स्वीकारताना खासगी एजंटला अटक

पनवेल: पुढारी वृत्तसेवा : पनवेल आरटीओ कार्यालयात वाहन परवाना काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीकडून अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी एजंटला रंगेहाथ पकडले. ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली. कळंबोली पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. भूषण यशवंत कदम (वय २९) असे या खासगी एजंटचे नाव आहे. या आठवड्यात पालिकेच्या एका बड्या अधिकाऱ्याला अशा प्रकारे लाच … The post पनवेल : ‘आरटीओ’ मध्ये अडीच हजारांची लाच स्वीकारताना खासगी एजंटला अटक appeared first on पुढारी.
#image_title
पनवेल : ‘आरटीओ’ मध्ये अडीच हजारांची लाच स्वीकारताना खासगी एजंटला अटक


पनवेल: पुढारी वृत्तसेवा : पनवेल आरटीओ कार्यालयात वाहन परवाना काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीकडून अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी एजंटला रंगेहाथ पकडले. ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली. कळंबोली पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. भूषण यशवंत कदम (वय २९) असे या खासगी एजंटचे नाव आहे. या आठवड्यात पालिकेच्या एका बड्या अधिकाऱ्याला अशा प्रकारे लाच घेताना अटक करण्यात आली होती. Panvel
लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे २१ नोव्हेंबरला वाहन परवाना काढण्यासाठी एजंट अतिरिक्त पैसे मागत असल्याची तक्रार आली होती. लर्निंग लायसन्स २००, पक्के लायसन्स ९०० असे एकूण ११०० रुपये असताना खासगी एजंटने तक्रारदाराकडून अडीच हजार रुपयांची मागणी केली होती. अडीच हजारांपैकी दीड हजार रुपये पहिला हप्ता म्हणून देण्यात येणार होता. तक्रारीप्रमाणे ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून आरटीओ खासगी एजंट भूषण कदम याला रंगेहाथ पकडले. Panvel
Panvel अधिकाऱ्यांच्या खासगी कर्मचाऱ्यांची चौकशी करावी : सुरेश सावंत समाजसेवक
पनवेल आरटीओ कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीला खासगी कर्मचारी चक्क कार्यालयात बसून शासकीय अधिकाऱ्यांची कामे करताना दिसून येतात. त्यामुळे या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी समाजसेवक सुरेश सावंत यांनी केली आहे. याबाबत सचिवाबरोबर बोलणे झाले असून त्यांना खासगी कर्मचाऱ्यांच्या नावाची यादी दिली आहे.
हेही वाचा 

रायगडचे सागर किनारे परदेशी पक्ष्यांनी बहरले
रायगड : विस्तारीत शहापूर औद्योगिक क्षेत्रातील मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध; पोलिसांची दडपशाही, २० जणांना घेतले ताब्यात
Konkan Divisional Police : कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत रायगडची चमकदार कामगिरी

The post पनवेल : ‘आरटीओ’ मध्ये अडीच हजारांची लाच स्वीकारताना खासगी एजंटला अटक appeared first on पुढारी.

पनवेल: पुढारी वृत्तसेवा : पनवेल आरटीओ कार्यालयात वाहन परवाना काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीकडून अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी एजंटला रंगेहाथ पकडले. ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली. कळंबोली पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. भूषण यशवंत कदम (वय २९) असे या खासगी एजंटचे नाव आहे. या आठवड्यात पालिकेच्या एका बड्या अधिकाऱ्याला अशा प्रकारे लाच …

The post पनवेल : ‘आरटीओ’ मध्ये अडीच हजारांची लाच स्वीकारताना खासगी एजंटला अटक appeared first on पुढारी.

Go to Source