पुढारी ऑनलाईन डेस्क: बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये राज्य, केंद्र सरकारच्या बचाव यंत्रणांसह आता दुर्घटनास्थळी तुटलेले ऑगर मशीन काढण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, आज (दि.२६ ) व्हर्टिकल ड्रिलिंग करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे आता १ ते १.२ मीटर व्यासाचा उभा खड्डा खणण्यात येत आहे. पहिल्या दीड तासात १५ मीटर उभा खड्डा पाडण्यात आला असून, अंदाजे ८६ मीटर खोल खोदावे लागेल, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. (Uttarkashi Tunnel Rescue)
#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | Vertical drilling underway at the site of the rescue of 41 workers. pic.twitter.com/DQTFHDtIIq
— ANI (@ANI) November 26, 2023
Uttarkashi Tunnel Rescue: ऑगर मशीन काढण्यासाठी लष्काराला पाचारण
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिल्क्यारा बोगद्यात ४१ कामगार गेल्या १५ दिवसांपासून अडकले आहेत. यांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर बचाव मोहीम राबवली जात आहे. या मोहीमेत सुरूवातीला अमेरिकन ड्रिलिंग मशीनच्या सहाय्याने बोगद्यात खोदण्यात येत होते. मात्र बचावकार्यादरम्यान ऑगर ड्रिलिंग मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते आदळले. त्यामुळे शुक्रवारी (दि.२४) बचावकार्य स्थिगित करण्यात आले. त्यानंतर हे ऑगर मशीन तात्पुरते दुरूस्त करून पुन्हा बचाव कार्य राबवण्यात आले. बोगद्यात कोसळलेल्या ढिगाऱ्यातून ड्रिलिंग करताना धातूच्या अडथळ्याचा सामना करावा लागल्याने ऑगर मशीन पुन्हा निष्क्रिय ठरले. यानंतर बोगद्यातील तुटलेले ऑगर ड्रिलिंग मशीन बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्काराला तैनात केले आहे. दरम्यान प्लाझ्मा कटरद्वारे अमेरिकन बस्टड ऑगर ड्रिलिंग मशीन काढण्याचे काम लष्कराच्या मदतीने सुरू आहे, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ ने दिले आहे. (Uttarkashi Tunnel Rescue)
येत्या दोन दिवसांत निश्चित व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू होणार
नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NHIDCL) चे व्यवस्थापकीय संचालक महमूद अहमद यांनी मॅन्युअल व्हर्टिकल ड्रिलिंग संदर्भात माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले की, “आम्ही अशी ठिकाणे ओळखली जिथे ड्रिलिंग अधिक चांगले होऊ शकते. कामगाराच्या बचावासाठी आम्ही २ ते ३ पर्यायांवर काम करायला सुरूवात केली आहे. यामधील एका पर्यायावर व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू झाले आहे. यामध्ये पहिल्या दीड तासात १ ते १.२ मीटर व्यासाचे १५ मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंग करण्यात आले आहे. ही दीर्घकालीन प्रक्रीया असून अजून अंदाजे ८६ मीटर खोल ड्रिलिंग करावे लागेल. येत्या दोन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होऊन २८ नोव्हेंबरपासून निश्चित व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू होईल, अशी आम्हाला आशा आहे, असेही महमूद अहमद यांनी स्पष्ट केले आहे.
#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | Mahmood Ahmad, the Managing Director of National Highways & Infrastructure Development Corporation Limited (NHIDCL) says, “We have now come to a stage where we started working on 2-3 more options since yesterday. We have told… pic.twitter.com/z7vzlkoVjw
— ANI (@ANI) November 26, 2023
ऑगर मशीन बोगद्यातून काढण्यासाठी प्लाझ्मा मशीन
बोगदाकाम तज्ज्ञ ख्रिस कूपर यांनी एएनआयला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, शुक्रवारी (दि.२४) बचावकार्यादरम्यान अमेरिकन-ऑगर ड्रिलिंग मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते आदळले. हे मशीन बोगद्यातच अडकले असून, त्याचे पार्ट अजूनही बाहेर काढण्यात येत आहेत. दरम्यान ऑगर मशीन कापून बाहेर काढण्यासाठी आता हैदराबाद येथून नवीन प्लाझ्मा मशीन मागवण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्या मदतीने प्लाझ्मा मशीनद्वारे बिघाड झालेले ऑगर बाहेर काढले जात आहे. प्लाझ्मा मशीन हे जास्त वेगाने स्टील कापते, त्यामुळे ऑगर ड्रिलिंग मशीन कापण्यासाठी आता प्लाझ्मा मशीनचा वापर करण्यात येत असल्याचे टनेल तज्ज्ञ कूपर यांनी म्हटले आहे.
बचावकार्यात पुढील तीन दिवस आव्हानात्मक
भारतीय हवामान विभागने २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान उत्तराखंडमध्ये वादळी पावसासह बर्फवृष्टीची इशारा दिला आहे. दरम्यान या भागात हवामान देखीस ढगाळ असेल. त्यामुळे सिल्क्यरा बोगद्याच्या ठिकाणी बचाव कार्यादरम्यान आणखी एक आव्हान निर्माण होवू शकते, अशी शक्यता देखील तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
आता मनोधैर्य राखण्यासाठी ‘लढाई’
बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांची सुटकेसंदर्भात अनिश्चितता असल्याने प्रशासन आणि बचाव यंत्रणेकडून त्यांची सर्वपातळीवर दक्षता घेतली जात आहे. कामगांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी देखील घेतली जात आहे. कामगारांची मानसिक स्थिती चांगली राहावी म्हणून, प्रशासनाकडून त्यांना मनोरंजनाचे साहित्य पुरवले जात आहे. कामगारांना लुडो सारखे व्हिडिओ आणि बोर्ड गेम खेळण्यासाठी मोबाईल फोन देण्यात आले आहेत. त्यांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी सापशिडीचा गेम देखील देण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले.
हेही वाचा:
Uttarkashi Tunnel Rescue: बचावकार्यात पुढील तीन दिवस आव्हानात्मक, जाणून घ्या काय आहे कारण?
Uttarkashi Tunnel rescue operation: आता मनोधैर्य राखण्यासाठी ‘लढाई’! ४१ कामगारांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न
Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशीतील ४१ कामगारांच्या बचावासाठी आता ‘मॅन्युअल व्हर्टिकल ड्रिलिंग’
The post बोगदा दुर्घटना ; ‘व्हर्टिकल’ खोदकामाला वेग, लष्करही तैनात appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क: बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये राज्य, केंद्र सरकारच्या बचाव यंत्रणांसह आता दुर्घटनास्थळी तुटलेले ऑगर मशीन काढण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, आज (दि.२६ ) व्हर्टिकल ड्रिलिंग करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे आता १ ते १.२ मीटर व्यासाचा उभा खड्डा खणण्यात येत आहे. …
The post बोगदा दुर्घटना ; ‘व्हर्टिकल’ खोदकामाला वेग, लष्करही तैनात appeared first on पुढारी.