राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रालयाच्या खात्यातून लाखो रुपये चोरीला

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : सरकार प्रचारांच्या फेरीला गुंतले असताना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या (Department of School Education) खात्यातून लाखो रुपये चोरीला गेले आहेत. त्यामुळे शासनाच्या कारभारावर यानिमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आरोपींनी शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि बनावट स्वाक्षरीद्वारे (Forged stamps, forged checks and forged signatures) चार टप्प्यात ४७ लाख ६० हजार काढल्याचा …

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रालयाच्या खात्यातून लाखो रुपये चोरीला

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : सरकार प्रचारांच्या फेरीला गुंतले असताना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या (Department of School Education) खात्यातून लाखो रुपये चोरीला गेले आहेत. त्यामुळे शासनाच्या कारभारावर यानिमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आरोपींनी शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि बनावट स्वाक्षरीद्वारे (Forged stamps, forged checks and forged signatures) चार टप्प्यात ४७ लाख ६० हजार काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी मरीनड्राइव्ह पोलीस ठाण्यात चौघांवर कमल ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४७१, ४७३, ३४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिक्षण विभागाच्या खात्यातून चोरीला गेलेली रक्कम ही नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून यांच्या खात्यावर जमा झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. याबाबचा पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
एका महिन्यात दुसऱ्यांदा अशी घटना घडल्याने संपूर्ण राज्याचा कारभार हाकणारी यंत्रणा सुरक्षित नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. मंत्रालयात प्रवेश करताना प्रत्येकाची अगदी काटेकोरपणे तपासणी केली जाते. सीसीटीव्हीने सगळ्यांवर नजर असते तरीही हा प्रकार घडल्याने अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. या प्रकारमुळे विरोधकांच्या हाती ऐन निवडणुकीच्या काळात आयते कोलीत मिळाले आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या मंत्रालय येथील बँकेत असलेल्या खात्यातून हा गैरप्रकार घडला आहे. मात्र अशा प्रकारे शासनाच्या खात्यातून पैसे चोरीला जाण्याचीही काही पहिली वेळ नाही. या आधी पर्यटन विभागाच्या खात्यातूनही अशाच प्रकारे 67 लाख चोरीला गेले होते. शासनाच्या खात्यातून अशा प्रकारे लाखो रुपये चोरीला जात असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे.
निवडणुकीच्या धामधुमीत शासनाचे आपल्या विभागाकडे लक्ष आहे की नाही असाच सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. मंत्रालयात जी बँक आहे. तिथून ही रक्कम चोरीला गेली आहे. ज्या आरोपीच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे. ती सर्व खाती कोलकाता येथील आहेत. महिन्याभरात ही दुसरी घटना असून आता तरी शासन जागे होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा 

मुंबईत शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
नाशिकच्या उमेदवारीसाठी मुंबईत लॉबिंग
मुंबई : प्रमुख आयटी कंपन्यांत 63 हजार कामगार कपात