अमिताभ बच्चन यांनाही अलिबागची भुरळ; खरेदी केली जागा

अलिबाग; पुढारी वृत्तसेवा : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाही आता अलिबागची भुरळ पडली आहे. बच्चन यांनी अलिबाग-वरसोली समुद्र किनारी जागा खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अलिबाग हे बॉलीवूड कलाकारांचे पसंतीचे ठिकाण ठरले आहे. अमिताभ बच्चन यांनी ‘द हाउस ऑफ अभिनंदन लोढ़ा’ यांच्याकडून १० हजार स्क्वेअर फूट एवढी जागा खरेदी केली आहे. ‘ए अलिबाग’ हा …

अमिताभ बच्चन यांनाही अलिबागची भुरळ; खरेदी केली जागा

अलिबाग; Bharat Live News Media वृत्तसेवा : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाही आता अलिबागची भुरळ पडली आहे. बच्चन यांनी अलिबाग-वरसोली समुद्र किनारी जागा खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अलिबाग हे बॉलीवूड कलाकारांचे पसंतीचे ठिकाण ठरले आहे.
अमिताभ बच्चन यांनी ‘द हाउस ऑफ अभिनंदन लोढ़ा’ यांच्याकडून १० हजार स्क्वेअर फूट एवढी जागा खरेदी केली आहे. ‘ए अलिबाग’ हा प्रोजेक्ट मागील वर्षी एप्रिल महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. २० एकरावर पसरलेला हा प्रोजेक्ट आहे. गेल्या आठवड्यात या व्यवहाराची नोंद झाल्याची माहिती आहे. या जमिनीची किंमत १० कोटी आहे. लक्झरी रिट्रीट आणि गुंतवणुकीच्या संधी शोधणाऱ्या लोकांसाठी अलिबाग हे पसंतीचे ठिकाण म्हणून उदयास आले आहे. मुंबईपासून जवळ असल्यामुळे सेलेब्सची ती पहिली पसंत बनली आहे.
महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंबीय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. बच्चन यांचा जन्म अलाहाबाद येथे झाला असून सध्या ते मुंबईत राहतात. मात्र, अनेक ठिकाणी त्यांची घर, मालमत्ता आहे. राम मंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यापूर्वी बच्चन यांनी अयोध्येत घर बांधण्यासाठी 14.5 कोटी रुपयांचा भूखंड खरेदी केला होता. आता त्यांनी अलिबाग येथे कोट्यवधी रुपयांची जमीन घेतली आहे.
हेही वाचा 

HBD Jaya Bachchan : जया बच्चन झाल्या ७६ वर्षांच्या; अमिताभ म्हणाले…माझी अर्धांगिनी
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांची बॉलिवूडमध्ये ५५ वर्षे पूर्ण; AI अवतारातील फोटो व्हायरल