Arvind Kejriwal: AAP ला धक्का! केजरीवालांच्या कोठडीत ७ मे पर्यंत वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्क: कथित दिल्ली मद्य धोरण मनी लॉड्रिंग प्रकरणात आम आदमी पक्षाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालच्या ईडी कोठडीत मंगळवार ७ मे पर्यंत वाढ केली आहे. त्यांच्यासोबत तेलंगणा बीआरएसच्या आमदार के.कविता आणि AAP ला फंड मॅनेज करण्यासाठी मदत करणारे चनप्रीत सिंग यांची देखील न्यायालयीन कोठडी ७ मे …

Arvind Kejriwal: AAP ला धक्का! केजरीवालांच्या कोठडीत ७ मे पर्यंत वाढ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: कथित दिल्ली मद्य धोरण मनी लॉड्रिंग प्रकरणात आम आदमी पक्षाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालच्या ईडी कोठडीत मंगळवार ७ मे पर्यंत वाढ केली आहे. त्यांच्यासोबत तेलंगणा बीआरएसच्या आमदार के.कविता आणि AAP ला फंड मॅनेज करण्यासाठी मदत करणारे चनप्रीत सिंग यांची देखील न्यायालयीन कोठडी ७ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. (Arvind Kejriwal)

[Excise policy case] Delhi court extends judicial custody of Delhi Chief Minister Arvind Kejriwal till May 7. #ArvindKejriwal @AamAadmiParty @ArvindKejriwal @dir_ed pic.twitter.com/imeZIDCmgJ
— Bar and Bench (@barandbench) April 23, 2024

राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश (पीसी ॲक्ट) कावेरी बावेजा यांनी सांगितले की, मंगळवारी (७ मे) होणाऱ्या सुनावणीला अरविंद केजरीवाल आणि के. कविता यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात दुपारी २ वाजता हजर केले जाईल, अशा सूचना देखील कोर्टाने दिल्या आहेत. (Arvind Kejriwal)
Arvind Kejriwal: केजरीवालांची ‘शुगर लेव्‍हल’ वाढली
रक्‍तातील साखरेचे प्रमाण ( शुगर लेव्‍हल) वाढल्‍याने दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंग प्रशासनाने इन्सुलिन दिले. दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 21 मार्च रोजी सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर केजरीवाल यांना दिलेला हा पहिला इन्सुलिनचा डोस होता, असे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे.
 
अरविंद केजरीवाल हे टाइप-2 मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यांची शुगर लेव्‍हल ३२० वर गेली होती. त्यांना तिहार तुरुंगात इन्सुलिन देण्यात आले, अशी माहिती आम आदमी पक्षाच्या (आप) सूत्रांनी आज (दि.२३) दिली. केजरीवाल हे सध्या 23 एप्रिलपर्यंत तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. एम्सच्या डॉक्टरांनी तुरुंग प्रशासनाला आवश्यक असल्यास डोस देण्याचा सल्ला दिल्यानंतर सोमवारी संध्याकाळी केजरीवाल यांना इंसुलिन देण्यात आले.
हेही वाचा:

Arrest of Arvind Kejriwal: केजरीवाल तुरुंगात काय खातात? न्यायालय करणार तपासणी
Sukesh on Arvind Kejriwal| ‘वेलकम टू तिहार’! केजरीवालांचा मुखवटा फाडणार; सुकेशचे तुरूंगातून पत्र
ED Summons to Arvind Kejriwal : मुख्यमंत्री केजरीवालांना तब्बल सातव्यांदा ईडीचे समन्स, २६ फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश