‘देश घडवणार्‍या पिढीचा मोदींकडून अपमान’ : अतुल लोंढे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आपल्या अगोदरच्या पिढीने देशाचा पाया रचला. काँग्रेसने धोरणात्मक निर्णय घेतले, त्यामुळे आपला देश विकसनशील देशांच्या शर्यतीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप नेते काँग्रेसचा नव्हे तर देश घडवणार्‍या पिढीचा अपमान करत आहेत. मोदींच्या जेवढ्या जास्त सभा होतील, तेवढ्या जास्त जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे …

‘देश घडवणार्‍या पिढीचा मोदींकडून अपमान’ : अतुल लोंढे

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : आपल्या अगोदरच्या पिढीने देशाचा पाया रचला. काँग्रेसने धोरणात्मक निर्णय घेतले, त्यामुळे आपला देश विकसनशील देशांच्या शर्यतीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप नेते काँग्रेसचा नव्हे तर देश घडवणार्‍या पिढीचा अपमान करत आहेत. मोदींच्या जेवढ्या जास्त सभा होतील, तेवढ्या जास्त जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत लोंढे बोलत होते. या वेळी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अ‍ॅड. अभय छाजेड उपस्थित होते. लोंढे म्हणाले, संविधानाची तोडफोड केली जात आहे. ईडी, सीबीआय या संस्थांचा अमर्याद वापर करून राजकीय अस्वस्थता निर्माण केली जात आहे. जाती- धर्मात तेढ निर्माण केले जात आहे.
हेही वाचा

विनापुरवणी परीक्षेला प्रारंभ; पावणेचार लाखांवर विद्यार्थी सामोरे जाणार परीक्षेला
Lok Sabha Election 2024 | महाविकास आघाडीचे २९ एप्रिलला शक्तिप्रदर्शन
पक्ष चिन्हाचा घोळ : बारामती लोकसभेत अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह; खा. सुळेंचा आक्षेप