‘भारत गौरव’ रेल्वे देवभूमीकडे थाटात रवाना; पुणे रेल्वे स्थानकावर पर्यटकांचे जंगी स्वागत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : देवभूमी अर्थात उत्तराखंडकडे निघालेल्या पर्यटकांचे सोमवारी सायंकाळी ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ताल, अशा पारंपरिक पद्धतीने पुणे रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आले. त्यानंतर फुग्यांनी सजविलेली वातानुकूलित ‘भारत गौरव’ ट्रेन (मानसखंड एक्स्प्रेस) उत्तराखंडच्या दिशेने दिमाखात रवाना झाली. उत्तराखंड सरकारचा टुरिझम विभाग आणि इंडियन रेल्वे, केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘देखो …

‘भारत गौरव’ रेल्वे देवभूमीकडे थाटात रवाना; पुणे रेल्वे स्थानकावर पर्यटकांचे जंगी स्वागत

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : देवभूमी अर्थात उत्तराखंडकडे निघालेल्या पर्यटकांचे सोमवारी सायंकाळी ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ताल, अशा पारंपरिक पद्धतीने पुणे रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आले. त्यानंतर फुग्यांनी सजविलेली वातानुकूलित ‘भारत गौरव’ ट्रेन (मानसखंड एक्स्प्रेस) उत्तराखंडच्या दिशेने दिमाखात रवाना झाली.
उत्तराखंड सरकारचा टुरिझम विभाग आणि इंडियन रेल्वे, केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘देखो अपना देश’ या संकल्पनेअंतर्गत चालविण्यात येणार्‍या पर्यटन ट्रेनमधून पुण्यातील 280 पर्यटक देवभूमीत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मानसखंड एक्स्प्रेसने जात आहेत. या सर्व पर्यटक प्रवाशांचे पुणे रेल्वे स्थानकावर लाल गालिचा अंथरून जंगी स्वागत करण्यात आले. रेल्वेगाडीतील पर्यटक प्रवाशांच्या हस्ते फीत कापल्यानंतर सोमवारी सायंकाळी रेल्वे रवाना झाली. या वेळी उत्तराखंड सरकारच्या टुरिझम विभागाचे सेक्रेटरी सचिन सुर्वे, आयआरसीटीसीच्या टुरिझम अँड मार्केटिंग विभागाचे डायरेक्टर राहुल हिमालयीन व अन्य अधिकारी आणि कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
मानसखंड एक्स्प्रेस पुण्यातून उत्तराखंडात जाणारी पहिली ‘भारत गौरव’ची रेल्वे आहे. उत्तराखंडच्या कुमाऊ विभागातील पर्यटनस्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी मानसखंड एक्स्प्रेस नावाची ही विशेष पर्यटक ट्रेन सुरू करण्यात आली आहे. ही ट्रेन दि. 24 एप्रिल 2024 रोजी उत्तराखंडमधील टनकपूर रेल्वे स्थानकावर पोहचेल. त्यानंतर उत्तराखंडमध्येच या 10 रात्री व 11 दिवसांच्या सहलीमध्ये नैनिताल, भीमताल, अल्मोरा, चौकोरी, पूर्णागिरी मंदिर, हातकालिका मंदिर, कातरमाळ, कैंचीधाम, चिताई गोलू देवता, जागेश्वर, शारदाघाट, पाताल भुवनेश्वर मंदिर, नानकमत्ता गुरुद्वारा, चंपावत आदी ठिकाणे पर्यटकांना पाहायला मिळणार आहेत.
कमी दरात सुरक्षित प्रवास
पुणे रेल्वे स्थानकावर मानसखंड एक्स्प्रेसमधील पर्यटक प्रवासी के. एम. सिन्हा आणि रिटा सिन्हा
दै. ‘Bharat Live News Media’च्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, या वातानुकूलित रेल्वेतून प्रवास करताना खूप छान अनुभव येत आहे. ‘भारत गौरव’ रेल्वेच्या माध्यमातून कमी दरात आणि सुरक्षित असा देशांतर्गत विविध पर्यटनस्थळी प्रवास करता येणार आहे. शासनाची ही संकल्पना खूप सुंदर आहे. आयोजकांचे खूप खूप आभार.
हेही वाचा

Lok Sabha Election 2024 | महाविकास आघाडीचे २९ एप्रिलला शक्तिप्रदर्शन
Loksabha election 2024 | पुणे 11, तर शिरूरमधून 7 उमेदवारांचे अर्ज
Hanuman Jayanti : बाबा महाकालांनी भस्‍म आरतीवेळी दिले हनुमान स्‍वरूपात दर्शन