Sassoon Hospital | अखेर डॉ. जाधव यांनी स्वीकारला ससूनच्या अधीक्षकपदाचा पदभार

पुणे : ससून रुग्णालयात अधीक्षकपदावरून मोठ्या घडामोडी सोमवारी बघण्यास मिळाल्या. अखेर रुग्णालयाचा अधीक्षकपदाचा पदभार डॉ. यल्लपा जाधव यांनी सोमवारी स्वीकारला. डॉ. जाधव यांनी रुग्णांसाठी काम करणार असल्याचे सांगितले. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांच्या जागी डॉ. यल्लपा जाधव यांची नियुक्ती करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले. यानंतर अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी याबाबतचे आदेश काढणे अपेक्षित होते.
परंतु, अधिष्ठाता यांनी कोणतेही आदेश दिले नाहीत. डॉ. तावरे यांचा पदभार डॉ. यल्लपा जाधव यांच्याकडे देण्याचे पत्र अधिष्ठाता यांच्याकडून मिळाले नसल्यामुळे डॉ. तावरे यांनी सोमवारी प्रश्न उपस्थित केला. डॉ. जाधव यांना अधीक्षक करा, असे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाचे असल्याने डॉ. जाधव यांनी पदभार स्वीकारावा, असे आदेश अधिष्ठाता यांनी सोमवारी काढले आणि वादावर पडदा पडला. डॉ. तावरे यांनी डॉ. जाधव यांच्याकडे पदभार दिला व त्यांचे स्वागत मावळते अधीक्षक डॉ. तावरे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
हेही वाचा
गावपातळीवर जनजागृती करा; सीईओ पाटील यांचे कर्मचार्यांना आवाहन
मलेशियामध्ये दोन हेलिकॉप्टर हवेत धडकले; १० जणांचा मृत्यू
बारामतीच्या रिंगणात 38 उमेदवार; सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार यांच्यातच खरी लढत
