PSI Result : देवडे गावचे सुपुत्र वैजीनाथ पाटील यांची पीएसआय पदी निवड
पटवर्धन कुरोली : Bharat Live News Media वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पीएसआय परीक्षा उत्तीर्ण झालेला गावातील पहिला अधिकारी वैजनाथ पाटील यांने प्रतिकुल परिस्थितीवर मात करत हा यशाचा पल्ला गाठला आहे.
देवडे येथील वैनाथ पाटील यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवडे, माध्यमिक शिक्षण कृषी विद्यालय शेळवे तसेच, उच्च माध्यमिक शिक्षण उमा कॉलेज पंढरपूर तसेच पदवीचे शिक्षण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून कृषी अभियंता B.tech पदवी संपादन केली. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2019 मध्ये पहिल्या प्रयत्न मेन्स पर्यंत चा पल्ला गाठला परंतु न्यायालयाच्या काही अडचणीमुळे परीक्षेचा निकाल राखून ठेवल्यामुळे 2020च्या निकालाची वाट न बघता 2021 च्या जाहिरातीमध्ये फॉर्म भरून सेल्फ स्डटी करून खुल्या प्रवर्गातुन रँक 65 मधून हे यश खेचून आणले व हे यश संपादन केले. तसे पाहता हे यश पहिल्या प्रयत्नात आहे. या यशामध्ये वडील नागनाथ आई मैना भाऊ आप्पाराव आणि वहिनी यांची मोलाची साथ मिळाली आहे.यशाचा उंच पल्ला गाठत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या पदापर्यंत मजल मारली आहे.
वडील शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे खुप तारेवरची करावी लागली आहे. आई वडील भाऊ वहिनी यांच्या सर्वांच्या कष्टाला यश आले. पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल संपूर्ण देवडे गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. वैजीनाथ च्या यशाबद्दल देवडे पंचक्रोशीतल नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.