छत्रपती संभाजीनगर : शेवगावच्या तरूणाचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू
पैठण; Bharat Live News Media वृत्तसेवा : हनुमान जयंती निमित्त कुलदेवतांना गोदावरी नदीचे जल अर्पण करण्यासाठी मित्रांसोबत कावडीने पाणी नेण्यासाठी आलेल्या २४ वर्षीय युवकाचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना पैठण तालुक्यातील चनकवाडी परिसरात सोमवारी (दि.२२) घडली. सुनील ज्ञानदेव केदार (वय २४, रा. धाटे वडगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर) असे या तरूणाचे नाव आहे.
सालाबाद प्रमाणे हनुमान जयंती निमित्त आपल्या गावातील पंचक्रोशीच्या ग्रामदेवतांना गोदावरीचे जल अर्पण केले जाते. यासाठी कवडीने पाणी नेण्यासाठी सुनिल मित्रांसोबत पैठणमध्ये आला होता. यादरम्यान पैठण शहराच्या लगत असलेल्या चनकवाडी परिसरातील गोदावरी नदीत उतरलेला सुनिल दिसेनासा झाल्याने मित्रांनी आजुबाजूला शोध घेतला. तो मिळून न आल्याने तो बुडाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना याची माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक फौजदार सुधीर ओव्हळ यांच्या पथकाने तरुणाच्या मदतीने तब्बल पाच तास नदीत त्याचा शोध घेतला. अखेर सांयकाळी सहाच्या दरम्यान सुनीलचा मृतदेह नदीत मिळून आला.
हेही वाचा :
‘पुतना मावशी’चं सोंग घेणाऱ्या पवारांना पीएम मोदींमध्ये ‘पुतीन’ दिसायला लागलेत : बावनकुळे
Lok Sabha Election 2024 : ईशान्य आणि वायव्य दिल्लीतील काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना कार्यकर्त्यांकडून विरोध
नाशिकमध्ये रंगणार तिहेरी सामना, ‘वंचित’कडून करण गायकर यांना उमेदवारी | Nashik Lok Sabha Elections