‘पुतना मावशी’चं सोंग घेणाऱ्या पवारांना पीएम मोदींमध्ये ‘पुतीन’ दिसायला लागलेत : बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : ‘पुतना मावशी’चं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना पंतप्रधान मोदी यांच्यात ‘पुतीन‘ दिसायला लागलेत, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि.२२) शरद पवारांवर निशाणा साधला. बावनकुळे म्हणाले, मतदारांचा ‘मोदी की गॅरंटी‘वर विश्वास आहे. त्यामुळेच पवारांच्या पायाखालची वाळू सरकली. गोवारी हत्याकांड, मावळ शेतकऱ्यांवरील गोळीबाराच्या निमित्तानं पवारांचा उग्र चेहरा मतदार कधीच विसरणार नाहीत, …
‘पुतना मावशी’चं सोंग घेणाऱ्या पवारांना पीएम मोदींमध्ये ‘पुतीन’ दिसायला लागलेत : बावनकुळे

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : ‘पुतना मावशी’चं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना पंतप्रधान मोदी यांच्यात ‘पुतीन‘ दिसायला लागलेत, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि.२२) शरद पवारांवर निशाणा साधला.
बावनकुळे म्हणाले, मतदारांचा ‘मोदी की गॅरंटी‘वर विश्वास आहे. त्यामुळेच पवारांच्या पायाखालची वाळू सरकली. गोवारी हत्याकांड, मावळ शेतकऱ्यांवरील गोळीबाराच्या निमित्तानं पवारांचा उग्र चेहरा मतदार कधीच विसरणार नाहीत, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी ट्टिटरवरून केला.
शरद पवारांचं विखारी राजकारण जनतेनं अनुभवलं आहे. त्यामुळेच सुज्ञ मतदारांनी त्यांना नाकारलं. आताही मतदारांचा ‘मोदी की गॅरंटी‘वर विश्वास आहे. त्यामुळेच पवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून ‘पुतीन-पुतीन‘ करत पवारांनी रडगाणं सुरू केलं आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना कितीही नावं ठेवली तरी पालघर साधू हत्याकांड, गोवारी हत्याकांड, मावळमधील शेतकऱ्यांवर केलेल्या अमानुष गोळीबाराच्या निमित्तानं दिसलेला पवारांचा उग्र चेहरा मतदार कधीच विसरणार नाहीत, असेही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा :

६० वर्षात झाले नाही ते दहा वर्षात करून दाखविले : उपमुख्यमंत्री फडणवीस
Nandurbar Lok Sabha Election : महायुतीच्या डॉ. हिना गावित यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Lok Sabha Election 2024 : ईशान्य आणि वायव्य दिल्लीतील काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना कार्यकर्त्यांकडून विरोध