राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राम नाईक, दत्तात्रय मायाळू यांचा सन्मान

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी (२२ एप्रिल) पद्म पुरस्कार २०२४ चे वितरण झाले. राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्राचे राम नाईक आणि दत्तात्रय मायाळू यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते ३ मान्यवरांना पद्मविभूषण, ७ मान्यवरांना पद्मभूषण तर इतरांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. …

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राम नाईक, दत्तात्रय मायाळू यांचा सन्मान

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी (२२ एप्रिल) पद्म पुरस्कार २०२४ चे वितरण झाले. राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्राचे राम नाईक आणि दत्तात्रय मायाळू यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते ३ मान्यवरांना पद्मविभूषण, ७ मान्यवरांना पद्मभूषण तर इतरांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रपती भवनात आय़ोजीत पद्म पुरस्कार सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २५ जानेवारी २०२४ रोजी पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी (२२ एप्रिल) त्यांचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते झाले.
माजी राष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सुलभ आंतरराष्ट्रीयचे संस्थापक बिंदेश्वर पाठक, भरतनाट्यम नृत्यांगणा पद्मा सुब्रमण्यम यांना पद्विभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तर अभिनेता मिथुन चक्रवर्ती, गायिका उषा उथप, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, उद्योजक सीताराम जिंदल यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
२०२४ या वर्षासाठी ५ पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि १३० पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले होते. त्यापैकी काही पुरस्कारांचे वितरण सोमवारी (२२ एप्रिल) झाले. उर्वरित पुरस्कारांचे वितरण पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या मान्यवरांची यादी
 
पद्मविभूषण
व्यंकय्या नायडू – सार्वजनिक क्षेत्र
बिंदेश्वर पाठक – समाजसेवा
डॉ. पद्मा सुब्रमण्यम – कला
पद्मभूषण
मिथुन चक्रवर्ती – कला
डॉ. सीताराम जिंदल- समाजसेवा
राम नाईक- सार्वजनिक क्षेत्र
तेजस पटेल- वैद्यकीय
दत्तात्रय मायाळू- कला
उषा उत्थुप – कला
चंदेश्वर प्रसाद ठाकूर- वैद्यकीय
पद्मश्री
खलील अहमद – कला
काळूराम बामनिया- कला
डॉ. रेजवाना चौधुरी बन्या- कला
नसीम बानो- कला
गीतारॉय बर्मन- कला
सरबेश्वर बसुमतरी- शेती
तकदीरा बेगम- कला
जानकीलाल भांड- कला
द्रोण भुईया- कला
रोहन बोपन्ना – खेळ
डॉ. सी आर चंद्रशेखऱ- वैद्यकीय
नारायण चक्रवर्ती- विज्ञान आणि अभियांत्रिकी
आर. एन. जो. डीक्रूज- साहित्य आणि शिक्षण
गुलाम नबी दार- कला
चित्तरंजन देववर्मा- अध्यात्म
डॉ. प्रेमा धनराज- वैद्यकीय
महावीर सिंह – कला
डॉ. मनोहर कृष्ण – वैद्यकीय
डॉ. एझदी एम इटालिया- वैद्यकीय
यशवंत सिंह कटोच- साहित्य
डॉ. जहीर इसाक काझी- साहित्य
डॉ. यानुंग जमोह लेगा- शेती
सतेंद्र सिंह लोहिया- खेळ
पूर्णिया मेहतो- खेळ
यांच्यासह इतर काही मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा 

Lok Sabha Election 2024 : ईशान्य आणि वायव्य दिल्लीतील काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना कार्यकर्त्यांकडून विरोध
मोदींच्या रूपाने देशात नवा पुतीन तयार होतोय का?: शरद पवारांनी व्यक्त केली चिंता 
Arvind Kejriwal ब्रेकिंग: केजरीवाल यांना मोठा झटका; इन्सुलिन मागणीची याचिका न्यायालयाने फेटाळली