Hanuman Jayanti | जयंती निमित्ताने भुसावळ येथे सामुहिक हनुमान चालीसा पठण

जळगाव- भुसावळ येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त दि. २३ सायंकाळी साडेसहा वाजता संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन शारदानगर येथे करण्यात आले आहे. भुसावळ येथील “प्रणिता प्रतिष्ठान” च्या वतीने हनुमान जन्मोत्सवाप्रित्यर्थ दि. 23 रोजी सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन शारदानगर भुसावळ येथील एन के नारखेडे शाळेसमोरील पटांगणावर करण्यात आले …

Hanuman Jayanti | जयंती निमित्ताने भुसावळ येथे सामुहिक हनुमान चालीसा पठण

जळगाव- भुसावळ येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त दि. २३ सायंकाळी साडेसहा वाजता संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन शारदानगर येथे करण्यात आले आहे.
भुसावळ येथील “प्रणिता प्रतिष्ठान” च्या वतीने हनुमान जन्मोत्सवाप्रित्यर्थ दि. 23 रोजी सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन शारदानगर भुसावळ येथील एन के नारखेडे शाळेसमोरील पटांगणावर करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून स्वामीनारायण मंदिराचे शास्त्री परमपूज्य धर्मस्वरूप जी तसेच गोंदवलेकर महाराज श्रीराम मंदिर ट्रस्ट जालना चे विश्वस्त जी आर ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत. सर्व भाविकांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केली आहे. मोठ्या संख्येने भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती प्रणिता प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेली आहे.