ईशान्य, वायव्य दिल्लीतील काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना कार्यकर्त्यांचा विरोध

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Lok Sabha Election 2024 : ईशान्य आणि वायव्य दिल्लीतील काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागत आहे. ईशान्य दिल्लीतून काँग्रेसने माजी जेएनयु नेता कन्हैया कुमार यांना तर वायव्य दिल्लीतून उदित राज यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, हे दोन्ही उमेदवार दिल्लीच्या बाहेरील असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्यांना प्रचंड …

ईशान्य, वायव्य दिल्लीतील काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना कार्यकर्त्यांचा विरोध

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : Lok Sabha Election 2024 : ईशान्य आणि वायव्य दिल्लीतील काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागत आहे. ईशान्य दिल्लीतून काँग्रेसने माजी जेएनयु नेता कन्हैया कुमार यांना तर वायव्य दिल्लीतून उदित राज यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, हे दोन्ही उमेदवार दिल्लीच्या बाहेरील असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्यांना प्रचंड विरोध केला जात असल्याचे दिसून आले आहे.
कन्हैया कुमार आणि उदितराज यांना उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्ली प्रदेश काँग्रेस कार्यालयात नारेबाजी करून आपला विरोध दर्शविला आहे. या दोन्ही उमेदवारांना बदलून तिथे स्थानिक नेत्यांना उमेदवारी देण्याची मागणी ईशान्य व वायव्य दिल्लीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. (Lok Sabha Election 2024)
कन्हैयाकुमार यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे नेते व माजी खासदार संदीप दीक्षित यांनीही आपली नाराजी दर्शवली आहे. कन्हैयाकुमार यांना तिकीट जाहीर झाल्यावर ते प्रदेश काँग्रेस कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी परिचय करून घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी संदीप दीक्षित हे कार्यकर्त्यांसोबत मागच्या रांगेत बसले होते.
कन्हैयाकुमार यांनी त्यांना पुढे येण्यास सांगून खुर्ची दिली होती. मात्र, तरीही नाराज असलेले दीक्षित यांनी त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे दोघांमध्ये खटके उडाल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Lok Sabha Election 2024)