कोल्हापूर : कवठेगुलंदात तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला
कवठेगुलंद, Bharat Live News Media वृत्तसेवा : कवठेगुलंद माळभाग (ता. शिरोळ) येथे असणाऱ्या स्वामी समर्थ झेरॉक्स सेंटरनजीक एक व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली. सतिश कृष्णात मगदूम (वय 36, रा. मौजे सांगाव, ता. कागल) येथील असून, तो दारु पिवून मयत अवस्थेत आढळला. त्याच्या मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
सतीश हा कवठेगुलंद माळभागावरील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. दरम्यान रविवारी (दि.21) रात्रीच्या सुमारास हॉटेललगत असलेल्या झेरॉक्स सेंटर जवळ सतीश दारु पिवून मृत अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. यानंतर नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत, पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या घटनेनंतर नातेवाईकांनी रूग्णालयात गर्दी केली होती. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेचा अधिक तपास कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हेड काँन्स्टेबल अनिल चव्हाण करत आहेत.
हेही वाचा
कोल्हापूर : नरतवडे येथे वृध्द महिलेचा दगडाने ठेचून खून
कोल्हापूर : कळंबा जेलमध्ये पुन्हा मोबाईल; कैद्यावर गुन्हा
कोल्हापूर : टोळीयुद्धातून गोळीबार; इस्टेट एजंट गंभीर जखमी