पिंपरी : निगडी प्राधिकरणात आज संत विचारांचा जागर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रथमच आयोजित होणार्या संत साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार महेश लांडगे यांनी निवड करण्यात आली आहे. रविवार (दि. 26) निगडी-प्राधिकरण येथील पाटीदार भवन येथे हे संमेलन होणार आहे.
संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊली, महान साधू श्रीमोरया गोसावी व जगद्गुरू संत श्रीतुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत प्रथमच संत साहित्य संमेलन होत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या उभारणीची संकल्पना आ. महेश लांडगे यांनी प्रत्यक्षात आणली.
यानिमित्ताने संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी त्यांनी निवड करण्यात आली आहे. नियोजन समितीच्या शर्मिला महाजन म्हणाल्या की, संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्य शिरोमणी शंकर अभ्यंकर, उद्घाटक माजी नगरसेवक अमित गावडे आहेत. तसेच, समर्थ भक्त समीर लिमये, संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज हभप शिरीष मोरे, राम कथाकार रवी पाठक, निरुपणकार व निवेदिका अनघा मोडक, माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांचे विचार ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. अनुष्का स्त्रीमंच, ज्येष्ठ नागरिक संघ पिंपरी-चिंचवड, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, समर्थ व्यासपीठ, शब्दरंग कला साहित्य कट्टा, रसिक साहित्य मंडळ, गौड ब्राह्मण समाज, ब्राह्मण जागृती सेवा संघ अशा विविध संस्था, संघटनांनी संमेलनाच्या आयोजनामध्ये पुढाकार घेतला आहे.
किशन महाराज चौधरी यांना जीवनगौरव
या संमेलनामध्ये आपण किशन महाराज चौधरी यांना ‘संत साहित्य अभ्यासक जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात येणार आहे; तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील दहा ज्येष्ठ संत साहित्य अभ्यासक यांचाही श्रीविठ्ठलाची मूर्ती देऊन गौरव करण्यात येणार आहे. संत साहित्याच्या पुस्तकांचे एक दालन इथे उभारण्यात येणार आहे. ग्रंथ दिंडी, लेझीम, ढोल पथक यांनी कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि पसायदान व पदन्यास करून संमेलनाची सांगता होणार आहे.
हेही वाचा
Nagar Crime News : अखेर कापूस चोरणारी टोळी केली गजाआड
Nagar News : मुक्त विद्यापीठात 70 कोटींचा गैरव्यवहार
दुग्धविकास मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालणार : दूधउत्पादनकांचा इशारा
The post पिंपरी : निगडी प्राधिकरणात आज संत विचारांचा जागर appeared first on पुढारी.
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रथमच आयोजित होणार्या संत साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार महेश लांडगे यांनी निवड करण्यात आली आहे. रविवार (दि. 26) निगडी-प्राधिकरण येथील पाटीदार भवन येथे हे संमेलन होणार आहे. संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊली, महान साधू श्रीमोरया गोसावी व जगद्गुरू संत श्रीतुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत प्रथमच संत साहित्य संमेलन …
The post पिंपरी : निगडी प्राधिकरणात आज संत विचारांचा जागर appeared first on पुढारी.
