ब्रेकिंग: केजरीवालांना मोठा दणका; इन्सुलिन मागणीची याचिका न्यायालयाने फेटाळली

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची याचिका इन्सुलिन मागणीची आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉक्टरांचा सल्ला घेण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. केजरीवाल यांना इन्सुलिन द्यायचे की नाही? याचा निर्णय एम्सचे पॅनेल घेईल, असे दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने सांगितले आहे. सीएम केजरीवाल यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी एम्सच्या संचालकांच्या नेतृत्वाखाली एक समिती तयार करण्यात आल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. (Arvind Kejriwal)
दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या न्यायालयीन कोठडीत असून ते तिहार तुरुंगात आहेत. त्यांना 21 मार्च रोजी चौकशीनंतर ईडीने अटक केली होती. केजरीवाल यांची साखर वाढल्यानंतर त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी पत्नीच्या उपस्थितीत डॉक्टरांना 15 मिनिटे नियमित भेटण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. तसेच तुरुंगात इन्सुलिन देण्याची मागणी देखील केजरीवालांना दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाकडे केली होती. परंतु दिल्ली कोर्टाने त्यांच्या या मागणीला नकार दिला आहे.
#BREAKING
Delhi Court rejects plea moved by Chief Minister Arvind Kejriwal for allowing daily consultation with his doctors through VC. #ArvindKejriwal pic.twitter.com/J8ntC2zfko
— Live Law (@LiveLawIndia) April 22, 2024
केजरीवालांची ‘अंतरीम जामीन’ संदर्भातील याचिका फेटाळली
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर हाेण्यासाठी दाखल याचिकेवर आज ( दि. २२) उच्च न्यायालयात सुनावणी झाली. ही याचिका न्यायालयाने फेटाळली. तसेच याचिकाकर्त्याकडे केजरीवाल यांनी दाखल करण्याचे अधिकार दिलेले कोणतेही पॉवर ऑफ ॲटर्नी नसल्याचे लक्षात घेऊन याचिकाकर्त्यावर ७५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
