सांगलीत विशाल पाटलांची माघार नाहीच! ‘लिफाफा’ चिन्हावर निवडणूक लढणार

Bharat Live News Media ऑनलाईन : Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. सोमवारी निवडणुकीतून माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी माघार घेतली नाही. ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यावर ठाम असून त्यांना ‘लिफाफा’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
मागच्याच आठवड्यात काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी बंडखोरी करत सांगली लोकसभा मतदार संघात अपक्ष अर्ज दाखल केला. सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. पण ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आहेत. ज्यामुळे या मतदार संघात चौरंगी लढत होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विशाल पाटलांना लिफाफा तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शिट्टी हे चिन्ह देण्यात आले आहे.
