चहा नव्हे, नेल आर्ट!

नवी दिल्ली : चहाला वेळ नसते. वेळेला चहा लागतो, असे म्हणणारे चहा शौकिन भरपूर आढळतील. चहासोबत चालणार्‍या गप्पांचा फड, हा देखील अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. काहींना हा चहा घटाघट पिऊन टाकणे आवडते तर काहींना त्याचा आस्वाद घेत पिणे आवडते. अशा चहांचे प्रकारही अमाप असतात. मसाला चहा, इराणी चहा, लेमन चहा, असे एकापेक्षा एक चहाचे प्रकार सध्या …

चहा नव्हे, नेल आर्ट!

नवी दिल्ली : चहाला वेळ नसते. वेळेला चहा लागतो, असे म्हणणारे चहा शौकिन भरपूर आढळतील. चहासोबत चालणार्‍या गप्पांचा फड, हा देखील अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. काहींना हा चहा घटाघट पिऊन टाकणे आवडते तर काहींना त्याचा आस्वाद घेत पिणे आवडते. अशा चहांचे प्रकारही अमाप असतात. मसाला चहा, इराणी चहा, लेमन चहा, असे एकापेक्षा एक चहाचे प्रकार सध्या बाजारात उपलब्ध असतात. एका व्हिडीओनुसार, एक व्हायरल झालेला चहा असाही आहे, जो पाहता येतो, पण पिता येत नाही आणि तो पिता येत नाही, यासाठी की, तो चहा नाहीच आहे, ते आहे एका युवतीने आपल्या नखावर साकारलेले चहा सेटचे नेल आर्ट!
तरुणींच्या नखांवर हा चहाचा सेट कसा साकारला गेला आहे, ते व्हायरल झालेल्या एका व्हिडीओतून दिसून येते आहे. इवल्याशा नखांवरील कपमध्ये दूध ओतून चहा तयार करून दाखवता येईल, अशी या नेल आर्टची रचना आहे.
आतापर्यंत आपण विविध प्रकारचे नेल आर्ट पाहिले असतील, पण व्हिडीओमध्ये झळकणारे हे नेल आर्ट अर्थातच हटके आहे. या नखांवर चक्क चहाचे दोन कप आणि एक साखरेचे भांडे साकारले गेले आहे. ही तरुणी एका चिमुकल्या किटलीतून या कपमध्ये चहा ओतते. त्या नखांवरील भांड्यामधील साखर त्या चहामध्ये टाकते आणि चिमुकल्या चमच्याने ती साखर ढवळते. अशा प्रकारे तयार होतो हा नखांवरील चहा. एका इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ 1 कोटी 15 लाखांपेक्षा अधिक नेटकर्‍यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर आश्चर्यही व्यक्त केले आहे.