नागपुरात पावसाने उडविली हनुमान भक्तांची तारांबळ

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपुरात गेल्या काही दिवसांपासून तापमान 41-42 अंशांवर पोहचले असताना सोमवारी (दि.२२) अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली. रविवारी रात्रभर तसेच आजही दुपारी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू होता. अचानक ढगाळ वातावरण आणि मुसळधार पावसामुळे भर उन्हाळ्यात लग्नमंडपात, स्वागत समारंभात तारांबळ उडविली.   पावसाने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र काही वेळातच पुन्हा …

नागपुरात पावसाने उडविली हनुमान भक्तांची तारांबळ

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपुरात गेल्या काही दिवसांपासून तापमान 41-42 अंशांवर पोहचले असताना सोमवारी (दि.२२) अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली. रविवारी रात्रभर तसेच आजही दुपारी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू होता. अचानक ढगाळ वातावरण आणि मुसळधार पावसामुळे भर उन्हाळ्यात लग्नमंडपात, स्वागत समारंभात तारांबळ उडविली.
 
पावसाने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र काही वेळातच पुन्हा उकाडा सुरू झाला. आज- उद्या हनुमान जयंती निमित्ताने ठीकठिकाणी मंदिरात धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच मेडिकल चौक, हनुमाननगर येथील श्री राजाबाक्षा हनुमान मंदिरातून तसेच गिट्टीखदान परिसरातील हनुमान मंदिरातून आकर्षक चित्ररथासह मोठ्या शोभायात्रा निघत असतात. या सर्व आयोजनांची तयारी करण्यात मूर्तिकार, हनुमान भक्त गुंतले असताना आज आलेल्या पावसाने त्यांची तारांबळ उडाली.
 
दरम्यान, टेकडी येथील हनुमान मंदिरात 60 -70 हजार लोकांचा महाप्रसाद मंगळवारी होत असल्याने त्याची पूर्वतयारी कालपासून जोरात सुरू झाली आहे. आज या ठिकाणी देखील काही प्रमाणात बदललेल्या हवामानाचा फटका बसला. एकाच वेळी उन्हाळा आणि पावसाळा असा विचित्र अनुभव सध्या नागपूरकर घेत आहेत. कुलर, एसी बाजारालाही त्याचा फटका बसला आहे.
हेही वाचा 

नागपूर: लग्नाला जाताना भीषण अपघात, दाम्पत्याचा मृत्यू, ६ जण जखमी
नागपूर: प्रेमीयुगुलाला लुटणारे दोन पोलीस जेरबंद
तळघरात आढळले 250 वर्षांहून जुने भुयार!