अंजनेरी पर्वतावर दोन लाख भाविक करणार हनुमान चालिसा पठण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- हनुमान जन्मोत्सव सोहळा मंगळवारी (दि. २३) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने अवघी नाशिक नगरी सज्ज झाली असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे. शहरातून पारंपारिक मार्गावरुन सायंकाळी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच रामभक्त हनुमान यांचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी पर्वतावरही जन्मोत्सवाची जय्यत तयारी …

अंजनेरी पर्वतावर दोन लाख भाविक करणार हनुमान चालिसा पठण

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- हनुमान जन्मोत्सव सोहळा मंगळवारी (दि. २३) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने अवघी नाशिक नगरी सज्ज झाली असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे. शहरातून पारंपारिक मार्गावरुन सायंकाळी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच रामभक्त हनुमान यांचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी पर्वतावरही जन्मोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 
शहर-परिसरातील हनुमान मंदिरांवर जन्मोत्सवनिमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच गाभारा विविधरंगी फुलांनी सजविण्यात आला आहे. हनुमान भक्तांकडून तयारीवर अंतिम हात फिरवला जात आहे. पंचवटीमधील पंचमुखी हनुमान मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामध्ये श्रींच्या मुर्तीला महाभिषेक व महाआरती करण्यात येईल. सामुहिक मारती स्त्राेत्र पठण केले जाणार आहे. आगारटाकळी येथील गोमय हनुमान मंदिरातही भजन-किर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय इतरही हनुमान मंदिरांमध्ये जन्मोत्सवासाठी जय्यत तयारी केली गेली आहे.
अंजनेरी येथे महाआरती
रामभक्त हनुमान यांचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी येथे जन्मोत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. अंजनेरी जन्मस्थान संस्थेकडून यंदाच्या वर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. पहाटेच्या वेळी साधु-महंतांच्या हस्ते श्रींच्या मुर्तीला महाभिषेक केले जाईल. त्यानंतर सकाळी पावणे दहा वाजता साधु-महंत व भाविकांच्या उपस्थितीत सामूहिक हनुमान चालीसाचे पठण व महाआरती करण्यात येईल. भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जाईल. 
अंजनेरीवरील धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा
– अंजनेरी येथे ध्वजारोहण
– पहाटे ५ पासून साधू-महंतांच्या हस्ते महायज्ञ
– दोन लाख भाविक करणार हनुमान चालिसा पठण
– सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी महाआरती
– हनुमान बीजमंत्र पठण
– साधू-महंतांना भगवे वस्त्रदान
-भक्तांसाठी महाप्रसाद
स्वच्छता मोहीम राबविणार
महाआरतीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी हनुमान जन्मस्थान संस्था व अंजनेरी ग्रामस्थांतर्फे मोफत पिण्याच्या पाण्यासह प्राथमिक औषधोपचाराची सुविधा पुरविली जाणार आहे. तसेच अंजनेरी पर्वताचे पावित्र्य राखण्यासाठी स्थानिक व स्वयंसेवकांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
हेही वाचा –

Lok Sabha Election 2024 : भाजपाचा विजयारंभ! ‘सुरत लोकसभा’ बिनविरोध जिंकली
छत्रपती संभाजीनगर : हर्सूल येथील कारागृह पोलिसाचा खून
Nashik Crime | खासगी सावकार वैभव देवरेची रवानगी सेंट्रल जेलला