नागपूर: लग्नाला जाताना भीषण अपघात, दाम्पत्याचा मृत्यू, ६ जण जखमी

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : वर्धा येथून नागपुरात एका लग्न समारंभासाठी येत असलेल्या श्रीवास्तव कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. स्कार्पियोच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ ट्रक ट्रॉलीवर जाऊन आदळली, नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी परिसरात हा अपघात झाला.
वर्धा जिल्ह्यातल्या रामनगर येथील श्रीवास्तव कुटुंब हे नागपूरला येत असताना बुटीबोरीचा ओव्हर ब्रिज ओलांडल्यानंतर हा भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त स्कॉर्पिओमधून श्रीवास्तव कुटुंबातील सहा जण व चालक असे एकूण सात जण प्रवास करत होते. राजेश मुरारीलाल श्रीवास्तव (वय 52) पूजा राजेश श्रीवास्तव (वय 45) अशी मृतांची नावे आहेत.
जखमींमध्ये राणी श्रीवास्तव वय (वय 63), अमन श्रीवास्तव (वय 26), संगीता श्रीवास्तव (वय 48), राकेश श्रीवास्तव (वय 52, सर्व रा. रामनगर, वर्धा) व चालक सारंग गोलहर (वय 26, रा. धामणगाव) यांचा समावेश आहे. जखमींवर बुटीबोरी येथील खाजगी इस्पितळात उपचार सुरू आहेत.
स्कार्पिओने (एमएच ४० बी इ 31 91) ही मंडळी नागपुरात येत होती. स्कार्पिओचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व रोडच्या बाजूला उभे असलेल्या (एमएच 29 एके 6186) ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आदळून ती उलटली. काही काळ वर्धा रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
हेही वाचा
नागपूर: प्रेमीयुगुलाला लुटणारे दोन पोलीस जेरबंद
नागपूर: पीएम मोदींनी जाणून घेतली पदाधिकाऱ्यांकडून ‘मन की बात’
संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष; रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्र
