भाजपचा विजयारंभ! ‘सुरत लोकसभा’ बिनविरोध जिंकली

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खाते आधीच उघडले असून गुजरातच्या सुरतमधील एका जागेवर भाजप उमेदवारचा विजय निश्चित झाला आहे. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द आणि इतर सर्व 8 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. या जागेवर आता भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार असल्याने त्याच्या विजयाची औपचरिक घोषणा होणे बाकी आहे.
गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांनी सोमवारी सोशल मीडियावर दलाल यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पाटील यांनी मुकेश दलाल यांच्या छायाचित्रांसह एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात म्हटलंय की, ‘सुरतने माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना पहिला विजय मिळवून दिला! सुरत लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुकेशभाई दलाल यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा!’
अर्ज माघारीचे नाट्य
सुरतमध्ये काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी आणि त्यांचे डमी उमेदवार यांचा अर्ज रद्द झाल्यानंतर तेथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. ज्यामुळे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजयी होण्याचा मार्ग मोळला झाला. केवळ बहुजन समाज पक्षाचे (बसपा) उमेदवार प्यारेलाल भारतीय यांनी दुपारी उशीरापर्यंत त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नव्हता. त्यामुळे प्यारे लाल भारती यांचा भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांकडून शोध घेतला जात होता. पण दुपारी दोननंतर भारती यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. ज्यामुळे दलाल यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोरतब झाला. दुसरीकडे उमेदवारी रद्द झाल्याने काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दर्शना जरदोश या सध्या सुरतच्या खासदार आहेत. त्या केंद्रात रेल्वे राज्यमंत्रीपदही सांभाळत आहेत.
Gujarat BJP president CR Paatil tweets “Congratulations and best wishes to Mukesh Dalal, candidate for Surat Lok Sabha seat, for being elected unopposed”#LokSabhaElections2024 pic.twitter.com/d0RgyQ8rtz
— ANI (@ANI) April 22, 2024
BJP candidate Mukesh Dalal from Surat won unopposed before the election.
As Congress leader Nilesh Kumbhani’s form got rejected and other 8 candidates repealed their forms.#LokSabhaElections2024 #Surat pic.twitter.com/R48ubfiKyn
— Pooja Sangwan ( Modi Ka Parivar ) (@ThePerilousGirl) April 22, 2024
