Zomato चा ग्राहकांना झटका; डिलिव्हरी चार्जेस 25% ने वाढवले

पुढारी ऑनलाईन डेस्क: Zomato झोमॅटो या ऑनलाईन खाद्यपदार्थ डिलिव्हरी कंपनीने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने तिच्या डिलिव्हरी चार्जेमध्ये शुल्कात 25% वाढ केली आहे. झोमॅटोने दिल्ली, बेंगळुरू सारख्या शहरांमधील ग्राहकांना हा मोठा धक्का दिला आहे. या संदर्भातील माहिती कंपनीच्या ॲपवर दिल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ ने दिले आहे. (Zomato Charges) फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato ने …

Zomato चा ग्राहकांना झटका; डिलिव्हरी चार्जेस 25% ने वाढवले

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: Zomato झोमॅटो या ऑनलाईन खाद्यपदार्थ डिलिव्हरी कंपनीने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने तिच्या डिलिव्हरी चार्जेमध्ये शुल्कात 25% वाढ केली आहे. झोमॅटोने दिल्ली, बेंगळुरू सारख्या शहरांमधील ग्राहकांना हा मोठा धक्का दिला आहे. या संदर्भातील माहिती कंपनीच्या ॲपवर दिल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ ने दिले आहे. (Zomato Charges)
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato ने आपल्या ग्राहक शुल्कात 25% वाढ केल्याने प्लॅटफॉर्म फी आता प्रति ऑर्डर 5 रुपये झाली आहे. हा बदल दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू, मुंबई, हैदराबाद आणि लखनऊ या प्रमुख शहरांना लागू करण्यात आला आहे. झोमॅटोने ऑगस्ट २०२३ मध्ये प्लॅटफॉर्म शुल्क आकारण्यास सुरुवात केली. सुरुवातीला, ते प्रति ऑर्डर २ रुपये होते आणि ऑक्टोबरमध्ये, कंपनीने त्यांच्या बहुतांश प्रमुख बाजारपेठांमध्ये शुल्क वाढवून ३ रुपये केले. Zomato ने १ जानेवारी रोजी युजर्ससाठी प्लॅटफॉर्म फी ३ रुपयांवरून ४ रुपये केली होती. त्यानंतर आता ग्राहकांना प्रति ऑर्डर ५ रुपये चार्जेस द्यावे लागणार आहेत. (Zomato Charges)
Zomato Charges: दररोज 2 ते 2.2 दशलक्ष ऑर्डर्स पुरवते
Zomato ही एक भारतीय बहुराष्ट्रीय रेस्टॉरंट एग्रीगेटर आणि फूड डिलिव्हरी कंपनी आहे. 2008 मध्ये दीपिंदर गोयल आणि पंकज चड्डाह यांनी याची स्थापना केली होती. अहवालानुसार, Zomato दररोज 2 ते 2.2 दशलक्ष ऑर्डर्सवर प्रक्रिया करते. Zomato चे मुख्य प्रतिस्पर्धी असलेले Swiggy, फूड डिलिव्हरी ऑर्डरवर 5 रुपये प्लॅटफॉर्म शुल्क आकारते.

Zomato raises its platform fee for food delivery customers by 25%, now charging Rs 5 per order as of April 20.
For more, tap here 👉https://t.co/Xn525dQZ57#Zomato #FoodDelivery #ZomatoDelivery #OnlineFoodOrder pic.twitter.com/Oi4GAoPaI4
— Business Standard (@bsindia) April 22, 2024

हे ही वाचा:

Zomato Deepinder Goyal Marriage : कोण आहे ग्रेसिया मुनोझ ? दीपिंदर गोयल यांनी केलं ‘या’ मॉडेलशी लग्न?
Zomato Pure Veg Fleet : झोमॅटो कंपनीच्या हिरव्या रंगातील टी शर्टचा फोटो व्हायरल! कारण ग्राहकांना मिळणार ‘ही’ नवी सुविधा
आता Zomato महिला डिलीव्हरी पार्टनर्स दिसणार नव्या लूकमध्ये! कंपनीने लॉन्च केला कुर्ता

Go to Source