छत्रपती संभाजीनगर : हर्सूल येथील कारागृह पोलिसाचा खून

छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : हर्सूल येथील मध्यवर्ती कारागृहतील पोलिसाचा खून झाल्याची घटना समोर आली. जेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. सिद्धार्थ बन्सीलाल जाधव (वय ४२, रा. जेल क्वार्टर) असे मृत पोलिसाचे नाव आहे.
सिद्धार्थ जाधव हे त्यांचा मित्र सचिन दाभाडे (वय ३६, रा. चेतनानगर) यांच्या सोबत जेलच्या मागील भागात दारू प्यायला बसले होते. तेथे नेमके काय घडले, हे समजले नाही. दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. दोघांच्याही डोक्यात लाकडी दांड्याने मारण्यात आले. त्यात जाधव यांचा मृत्यू झाला तर दाभाडे जखमी झाले. हर्सूल ठाण्याच्या निरीक्षक सुनिता मिसाळ, उपनिरीक्षक निर्वळ यांनी घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळी दोघांचेही बूट आढळून आले. त्यांच्यात वाद झाली की आणखी कोणी त्यांना मारहाण केली, हे समजू शकलेले नाही. अधिक तपास पोलिस करत आहेत.
हेही वाचा :
बीड : केजमध्ये भाच्याच्या लग्नाला निघालेल्या मामाचा अपघातात मृत्यू
बीड: गेवराई येथे अवैध वाळू वाहतूक करणारे तीन हायवा पकडले: सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त
बीड: उमापूर- शेवगाव रस्त्यावरील अपघातात सख्ख्या भावाचा मृत्यू; एक जण गंभीर
