मंगेश देसाई- स्मिता तांबेचा ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ ओटीटीवर
पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांचा ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा ४ डिसेंबर २०२३ रोजी मराठी ओटीटीवर ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुंडलिक धुमाळ यांनी केले असून स्वतंत्र गोयल यांनी निर्मिती केली आहे.
संबंधित बातम्या
‘गाथा नवनाथांची’ कलाकारांनी घेतलं श्रीक्षेत्र नरसोबाची वाडीचे दर्शन
iffi awards 2023 : तीन पिढ्यांच्या घर- कुटुंबावर भाष्य करणारा ‘गुलमोहोर’ सादर
iffi awards 2023 : नवाजुद्दीन सिद्दीकीची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एन्ट्री
लग्न म्हणलं की, घरात सनईच्या आवाजाबरोबर उत्साहाचं वातावरण दाटतं. पण गौरीच्या लग्नाचा विषय काढताच घरात एक गंभीर वातावरण पसरतं. गौरी सर्वगुण संपन्न असली तरी तिच्या काळ्या रंगामुळे तिला लग्नासाठी नवरा मिळणं कठीण झालं आहे. तिची नैराश्य अवस्थाही वाढत चालली आहे, पण तिला समजून घेणारा शाळेतला एक मास्तर तिच्या आयुष्यात आला आहे. गौरी मास्तराच्या प्रेमात पडली आहे खरं, पण मास्तर तिला स्वीकारेल का? हे पाहण्यासाठी चाहत्यांनी उत्सुकता वाढली आहे.
‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ या चित्रपटाच्या प्रीमियर संदर्भात, ‘नाही निर्मळ जीवन, काय करील साबण, तैसे चित्तशुद्ध नाही, तेथे बोध करील काई’ हे संत तुकारामांचे बोल आठवतात. माणसाचं सौंदर्य त्याच्या रंगावरून ठरत नसतं, तर मन साफ असावं लागतं, सांगणारा हा चित्रपट सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सीईओ श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले आहेत.
(video : ultramarathi instagram वरून साभार)
View this post on Instagram
A post shared by Ultra Jhakaas (@ultrajhakaas)
The post मंगेश देसाई- स्मिता तांबेचा ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ ओटीटीवर appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांचा ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा ४ डिसेंबर २०२३ रोजी मराठी ओटीटीवर ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुंडलिक धुमाळ यांनी केले असून स्वतंत्र गोयल यांनी निर्मिती केली आहे. संबंधित बातम्या ‘गाथा नवनाथांची’ कलाकारांनी घेतलं श्रीक्षेत्र नरसोबाची वाडीचे दर्शन iffi awards 2023 : …
The post मंगेश देसाई- स्मिता तांबेचा ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ ओटीटीवर appeared first on पुढारी.