संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लडाखमध्ये घेतली सैनिकांची भेट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लडाखमधील लेहमध्ये पोहोचले आहेत. तिथे त्यांनी सियाचीनमध्ये तैनात असलेल्या सशस्त्र दलाच्या जवानांची भेट घेतली आणि संवाद साधला. जवानांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान भारत माता की जयच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
आज सकाळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दिल्लीहून विमानाने सियाचीनला रवाना झाले. त्यांनी X वर पोस्ट शेअर करत लिहिले की, “मी दिल्लीहून सियाचीनला जात आहे. तेथे तैनात असलेल्या आमच्या धाडसी सशस्त्र दलाच्या जवानांशी संवाद साधण्यास उत्सुक आहोत.”
सियाचीन बेस कॅम्पवर जवानांना संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर तुम्ही ज्या प्रकारे देशाचे रक्षण करता. त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. सियाचीनची जमीन ही सामान्य जमीन नाही, ते एक प्रतीक आहे. हे देशाचे सार्वभौमत्व आणि एकता दर्शवते. आपली राष्ट्रीय राजधानी दिल्ली आहे, मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे, आपली तांत्रिक राजधानी बेंगळुरू आहे, पण सियाचीन ही शौर्य आणि धैर्याची राजधानी आहे.
राजनाथ सिंह सियाचीनला सैनिकांसोबत होळी सण साजरा करणार होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्यावेळी संरक्षण मंत्री लेहमध्येच जवानांसोबत होळी साजरी करून परतले होते.
Defence Minister Rajnath Singh with the Armed Forces personnel deployed at Kumar post of Siachen Glacier in Ladakh.
He interacted with them here, today. pic.twitter.com/EHC5Mp0gem
— ANI (@ANI) April 22, 2024
हेही वाचा :
अमित शहांची संपत्ती 5 वर्षांत 35 कोटींनी वाढली
केजरीवालांच्या ‘अंतरीम जामीन’ संदर्भातील याचिका फेटाळली, हायकाेर्टाने याचिकाकर्त्याला ठाेठावला दंड
ममतादीदींना धक्का; २४ हजार शालेय शिक्षकांची भरती कोर्टाकडून रद्द
