बिहार: वलसाड एक्सप्रेसमध्ये आग, आग विझवताना कॉन्स्टेबलचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: बिहारमध्ये वलसाडा एक्सप्रेसमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ती विझवताना अग्निशमन सिलिंडरचा स्फोट झाल्याने ड्युटीवर असलेल्या आरपीएफ हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. वलसाड-मुझफ्फरपूर ट्रेनमध्ये ही घटना आज (दि.२२) सकाळी घडली आहे. (Blast in Train)
मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकावर वलसाड एक्स्प्रेसच्या बोगीत झालेल्या स्फोटात एका आरपीएफ जवानाचा मृत्यू झाला. बोगीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. आरपीपीएफच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी कॉन्स्टेबल विनोद कुमार यांनी लहान फायर सिलिंडरने (अग्निशामक यंत्र) आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान आगीच्या सिलिंडरचा स्फोट झाला. हा अपघात इतका भीषण होता की विनोद कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली होती. रेल्वे अधिकाऱ्यांनी विनोद कुमार यांना रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Blast in Train)
देखें वीडियो, रेलवे स्टेशन पर खड़े-खड़े बिहार की ट्रेन जलने लगी धू-धूकर, बुझाने गया जवान भी खत्म..#RailwayStation #Train #Bihar #BiharNews #बिहार_न्यूज़ #बिहार #LiveCities pic.twitter.com/K5VkXQ5bqc
— Live Cities (@Live_Cities) April 22, 2024
Blast in Train: सिलिंडरचे कुलूप उघडताच स्फोट
वलसाड एक्स्प्रेस सोमवारी सकाळी 6.30 वाजता मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकावर आल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळानंतर रेल्वेच्या एस-८ बोगीच्या टॉयलेटमधून आगीच्या ज्वाळांच्या ज्वाला निघू लागल्या. आगीची माहिती मिळताच रेल्वे आणि आरपीएफच्या पथकांनी येथे पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. आग आटोक्यात आणण्यासाठी आरपीएफ जवान विनोद कुमारही दाखल झाले. त्यांनी फायर सिलेंडरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. आगीचा एक सिलिंडर संपला पण आग विझली नाही. दरम्यान, त्यांनी दुसऱ्या फायर सिलिंडरने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. सिलिंडरचे कुलूप उघडताच सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये विनोद कुमार यांचा मृत्यू झाला. (Blast in Train)
हे ही वाचा:
Salman Khan Firing : गोळीबारातील बंदूक शोधण्यासाठी क्राईम ब्रँचची टीम पोहोचली सुरतमध्ये
अमित शहांची संपत्ती 5 वर्षांत 35 कोटींनी वाढली; एकूण मालमत्ता 65.67 कोटी
NASA On Moon: चंद्राचा काही भाग काबीज करण्याच्या चीनचा प्रयत्न, NASA प्रमुख म्हणाले,
