देशात 2026 पर्यंत दाखल होणार एअर टॅक्सी सेवा
मुंबई : वाहतूक कोंडी ही प्रत्येक महानगरासाठी डोकेदुखीचा विषय ठरली आहे. त्यामुळे प्रदूषणात भर पडत असून, कामाचे तासही वाया जात आहेत. यावर एअर टॅक्सीचा मार्ग अवलंबण्यात येत आहे. नवी दिल्लीतील व्यावसायिक केंद्र असलेल्या कॅनॉट प्लेस ते गुरगावमध्ये 2026 पर्यंत हवाई टॅक्सीसेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.
कॅलिफोर्नियातील ईव्होल्ट कंपनी आर्चर एव्हिएशनने याबाबत माहिती दिली. अवघ्या सात मिनिटांत दोन्ही व्यावसायिक केंद्र जोडली जातील. दिल्लीतील या दोन ठिकाणी कारने जाण्यासाठी एक तास लागतो. मात्र, या सेवेसाठी तितकेच पैसे मोजावे लागतील. कारण, एका वेळचे भाडे तीन हजार रुपये राहील. या मार्गावर धावणार्या कारपेक्षा पाचपट अधिक भाडे त्यासाठी मोजावे लागेल.