गोळीबारातील बंदूक तापी नदीत फेकली, क्राईम ब्रँचची टीम सुरतमध्ये!

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर १४ एप्रिल रोजी गोळीबाराची घटना घडली होती. बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan Firing) निवासस्थानावर गोळीबार करताना आरोपीने वापरलेली बंदूक शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे एक पथक आता सुरतला पोहोचले. चौकशीत आरोपींनी गुन्हा केल्यानंतर त्यांनी बंदूक तापी नदीत फेकल्याचे गुन्हे शाखेला सांगितले. (Salman Khan Firing) गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांनी …

गोळीबारातील बंदूक तापी नदीत फेकली, क्राईम ब्रँचची टीम सुरतमध्ये!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर १४ एप्रिल रोजी गोळीबाराची घटना घडली होती. बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan Firing) निवासस्थानावर गोळीबार करताना आरोपीने वापरलेली बंदूक शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे एक पथक आता सुरतला पोहोचले. चौकशीत आरोपींनी गुन्हा केल्यानंतर त्यांनी बंदूक तापी नदीत फेकल्याचे गुन्हे शाखेला सांगितले. (Salman Khan Firing)
गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांनी दोन आरोपी विक्की गुप्ता (वय २४) आणि सागर पाल (वय २१) यांना गुजरातमधील कच्छ येथून अटक केली होती.

Firing incident outside actor Salman Khan’s residence on April 14 | A team from the Mumbai Crime Branch reached Surat to search for the gun that the accused used in firing at Bollywood actor Salman Khan’s residence.
During interrogation, the accused told the Crime Branch that…
— ANI (@ANI) April 22, 2024
रिपोर्टनुसार, याआधी गोळीबारात वापरण्यात आलेली मोटारसायकलीच्या मालकाची चौकशीदेखील केली आहे. मोटारसायकल नवी मुंबईच्या पनवेल परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या नावे रजिस्टर होती.
सलमान खानच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर तो ‘सिकंदर’ मध्ये दिसेल. या चित्रपटाच्या टायटलची घोषणा सलमान खानने ईद निमित्त केली होती. पुढील वर्षी हा चित्रपट रिलीज होईल. चित्रपटाचे दिग्दर्शन ए आर मुरुगदास करत आहेत.