गोळीबाराच्या कॉलने शहरात खळबळ; चौकशीअंती समोर आला ‘हा’ खुलासा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात सलग चार दिवस गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर शनिवारी रात्री देखील हडपसर परिसरात गोळीबाराची घटना घडल्याच्या नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे एकच खळबळ उडाली. ही बातमी हवेसारखी पसरल्यानंतर पोलिसांकडून याबाबत चौकशी केल्यानंतर असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. शनिवारी काळेपडळ येथील हनुमान मंदिराशेजारी एका कार्यक्रमानिमित्त परिसरातील तरुण एकत्र आले होते. …
गोळीबाराच्या कॉलने शहरात खळबळ; चौकशीअंती समोर आला ‘हा’ खुलासा

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरात सलग चार दिवस गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर शनिवारी रात्री देखील हडपसर परिसरात गोळीबाराची घटना घडल्याच्या नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे एकच खळबळ उडाली. ही बातमी हवेसारखी पसरल्यानंतर पोलिसांकडून याबाबत चौकशी केल्यानंतर असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. शनिवारी काळेपडळ येथील हनुमान मंदिराशेजारी एका कार्यक्रमानिमित्त परिसरातील तरुण एकत्र आले होते. त्या वेळी ’डीजे’च्या तालावर नाचत असताना दोन गटात हाणामारी झाली.
गर्दीमध्ये हाणामारी करणारे तरुण पळून गेले. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त असल्याने तत्काळ कार्यक्रम बंद करण्यात आला. पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार झाला नाही. नागरिकांमध्ये गोळीबार झाल्याची खोटी माहिती पसरली. दरम्यान, गोळीबाराचा कोणताही प्रकार घडला नसल्याची माहिती हडपसर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (गुन्हे) मंगल मोढवे यांनी दिली.
हेही वाचा

उन्हापासून पुणेकरांना किंचित दिलासा : पावसामुळे घटले तापमान
बांगलादेशी घुसखोर महिलांना पकडले; सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई
मणिपूरमधील ११ निवडणूक केंद्रांवर आज फेरमतदान