नाशिक हवं असेल तर…. महायुतीत रंगला वाद
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
नाशिक हवे असल्यास ठाणे भाजपला द्या, अशी सूचना भाजप नेत्यांनी शिंदे गटाला केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव पुढे आल्याचे समजते.
मुंबई, ठाण्यातील पाच जागा आणि नाशिक सहावी जागा या जागांच्या वाटपावरून महायुतीत वाद सुरु आहे. यापूर्वी संभाजी नगर आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जागांवर तोडगा काढण्यात आला. यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी भाजपला देऊ न नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे या शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली. राणे केंद्रात मंत्री आहेत, तर भुमरे हे राज्यात मंत्री आहेत. या दोन जागांवरून तिढा सुटला असला तरीही मुंबईतील दोन ठाणे, पालघर, नाशिक येथील तिढा अद्याप कायम आहे. पालघर मतदार संघ भाजप स्वत:कडे घेऊ न बहुजन विकास आघाडीला देणार असल्याचे समजते. या मतदार संघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नाशिक मध्ये महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे इच्छुक आहेत. तर ठाण्यात भाजपकडून संजीव नाईक आणि संजय केळकर या दोन नावांची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाकडून प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. मतदार संघ ज्याच्या वाट्याला येईल त्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी घोषित होईल.
हेही वाचा:
“तिच्यासाठी येणारा प्रत्येक तास महत्त्वाचा..” : अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या गर्भपातास सुप्रीम कोर्टाची परवानगी
Health Insurance : बदल आरोग्य विम्यातील
अयोध्या : प्राणप्रतिष्ठेपासून आतापर्यंत दीड कोटी लोकांनी घेतले रामलल्लाचे दर्शन; दरराेज १ लाख भक्तांची हजेरी