ममतादीदींना धक्का; २४ हजार शालेय शिक्षकांची भरती कोर्टाकडून रद्द
कोलकाता ; Bharat Live News Media ऑनलाईन शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारला कोलकाता हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग पॅनलने केलेली शालेय शिक्षक भरती हायकोर्टाने रद्द केली आहे. हायकोर्टाने 2016 चे संपूर्ण जॉब पॅनल रद्द केले असून सुमारे 24 हजार नोकऱ्या हायकोर्टाने रद्द केल्या आहेत. या भरतीत 5 ते 15 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.