दुर्दैवी ! व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू

भोर : सकाळी लवकर उठून व्यायाम करत असताना अचानक बेशुद्ध होऊन अजय काळू भोसले (वय 21, रा. भोलावडे) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना भोलावडे (ता. भोर) येथील पद्मावती हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. 19) घडली. याबाबत संजय सुरेश भोसले (वय 25, रा. आंबेडकरनगर, भोलावडे) यांनी भोर पोलिस ठाण्यात खबर दिली. संजय भोसले आणि अजय भोसले हे …

दुर्दैवी ! व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू

भोर : सकाळी लवकर उठून व्यायाम करत असताना अचानक बेशुद्ध होऊन अजय काळू भोसले (वय 21, रा. भोलावडे) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना भोलावडे (ता. भोर) येथील पद्मावती हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. 19) घडली. याबाबत संजय सुरेश भोसले (वय 25, रा. आंबेडकरनगर, भोलावडे) यांनी भोर पोलिस ठाण्यात खबर दिली. संजय भोसले आणि अजय भोसले हे व्यायाम करण्यासाठी शुक्रवारी भोलावडे येथील पद्मावती हॉटेलसमोर थांबले होते. त्यानंतर अजयने सात-आठ जोर मारले व थोडा व्यायाम केला. त्यानंतर तो बेशुद्ध होऊन खाली पडला. दरम्यान, उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
हेही वाचा

China Flood : चीनमध्ये आज येणार शतकातील सर्वांत मोठा महापूर?
Weather Update : राज्यात उष्णतेच्या लाटेसह पाऊसही; हवामान विभागाचा इशारा
Lokshabha Elections 2024 : अमित शहांची संपत्ती ५ वर्षांत ३५ कोटींनी वाढली