विराटच्‍या संतापाचा ‘स्‍फाेट’!आऊट दिल्यानंतर पंचांवर भडकला, नेमकं काय घडलं? (व्‍हिडिओ)

विराटच्‍या संतापाचा ‘स्‍फाेट’!आऊट दिल्यानंतर पंचांवर भडकला, नेमकं काय घडलं? (व्‍हिडिओ)

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : कोलकाताविरूद्धच्या सामन्यात 223 धावांच्‍या लक्ष्‍याचा सामना करताना ‘आरसीबी’चा स्टार फलंदाज विराट कोहलीने दमदार सुरूवात केली. अवघ्या 6 चेंडूमध्ये त्याने 18 धावा फटकावल्या. मात्र, हर्षित राणाच्या तिसऱ्या षटकात तो झेलबाद झाला. त्यानंतर, या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करतच त्याने मैदान सोडलं. IPL मधील आजच्‍या सामन्‍यात नेमकं काय़ घडलं? याविषयी जाणून घेवूया…
कोलकाताने बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाज करत 20 षटकात 6 गडी गमावत 222 धावांपर्यत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी बंगळुरूचे सलामीवीर फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली मैदानावर उतरले. पहिल्याच षटकात त्यांनी 12 धावा फटकावत दमदार सुरूवात केली. यामध्ये विराटच्या एका षटकाराचा समावेश होता.
विराटच्‍या संतापाचा स्‍फाेट
तिसऱ्या षटकात हर्षित राणाने विराटला झेलबाद केले. या चेंडूवर विराटने आक्षेप घेतला. हा चेंडू फुलटॉस असल्याचा दावा केला. त्याने थर्ड अंपायरकडे दाद मागितली थर्ड अंपायर मायकल दफ यांनी मैदानावरील पंचांनी निर्णय योग्य ठरवला. मात्र हा निर्णय विराटला न पटल्य़ाने तो संतापाने मागे फिरला मैदानाबाहेर जाताना विराटच्या चेहऱ्यावर तीव्र संताप दिसत होता. त्याने स्टेडियमवरील डस्टबिन हाताने उडवला. ताे रागाने बडबडतच पॅव्हिलियनमध्ये परतला. यानंतरही ताे काहीवेळ हा चेंडू कसा चुकीचा हाेता याबाबत आपल्‍या सहकार्यांशी चर्चा करताना दिसला. या सामन्‍यात  विराटच्य़ा आऊट होण्याबरोबर त्याच्या संतापाची चर्चा सर्वत्र होत आहे.

#KKRvRCB #ViratKohli
Angry Virat Kohli pic.twitter.com/HZwTBdEYHv
— Dhonism (@Dhonismforlife) April 21, 2024